शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगारांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

By admin | Updated: February 5, 2016 02:35 IST

हरवलेल्या बालकांचा शोध घेतानाच बाल कामगारविरोधात हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातून २५ बाल कामगारांची सुटका करण्यात आली.

शशी करपे,  वसईहरवलेल्या बालकांचा शोध घेतानाच बाल कामगारविरोधात हाती घेण्यात आलेल्या धडक मोहिमेत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातून २५ बाल कामगारांची सुटका करण्यात आली. यावेळी चौदा जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून प्रत्येक वीस हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. तर पालघर जिल्ह्यातून महिन्याभरात तब्बल १७८ बालकांचा शोध घेऊन त्यापैकी १५३ बालकांना पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. उर्वरित बालकांना बाल गृहात पाठवून त्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आले आहे.पालघर जिल्हा बाल संरक्षण कक्षाने पालघर जिल्हा पोलीस, वुमन ट्रॅफिकिंंग सेल, रेल्वे पोलिसांच्या मदतीने आॅपरेशन स्माईल-२ अभियान हाती घेतले असून जानेवारी महिन्यात केलेल्या धडक कारवाईत विरार, नालासोपारा आणि सफाळे परिसरातील दुकानांमध्ये काम करणाऱ्या २५ बालकांची सुटका केली. यावेळी चौदा दुकानदारांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची कारवाई केली.या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणांहून १७८ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. यातील १५३ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. उर्वरित २५ बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर जिल्ह्यातील बालगृहात ठेवण्यात आले असून त्यांची पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यातील पालघर जिल्ह्यातील अपवाद वगळता बरीचशी बालके नेपाळ, बिहार, राजस्थान. उत्तरप्रदेश आदी राज्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संदीप लांजेवार यांनी दिली. येथील व्यावसायिक अल्प पगारात दिवस-रात्र काम करणारे मजूर म्हणून त्यांना अधिक पसंती देतात.दरम्यान, ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक राजेश प्रधान यांनीही आॅपरेश स्माईल अंतर्गत जिल्ह्यातील बेपत्ता आणि हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. यासंदर्भात अधिक शोध सुरु आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत १ जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१५ (आॅगस्ट २०१४ पर्यंत यात पालघर जिल्ह्याचा समावेश होता) पर्यंत १ हजार ३१ मुली हरवल्याची नोंद होती. यातील १ हजार १५ मुली सापडल्या होत्या तर १६ मुली बेपत्ता होत्या. तसेच ६६१ मुले बेपत्ता झाल्याची नोंदी होत्या. त्यापैकी ६३५ मुले सापडली होती. तर २६ मुले बेपत्ता होती.