शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- कल्याण स्टेशनवर निर्लज्ज पोलिसाचे महिलेशी अश्लील चाळे, सहप्रवाशांनी फटकावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 16:13 IST

प्रवाशांबरोबर एक पोलीस कर्मचारी बसला होता.

कल्याण- कल्याण रेल्वे स्टेशनवरील अत्यंत धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर घडलेली एक लाजिरवाणी ही घटना आहे. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी बसायला असलेल्या बाकांवर काही प्रवासी बसलेले होते. तेथे त्या प्रवाशांबरोबर एक पोलीस कर्मचारी बसला होता. त्यावेळी तो पोलीस कर्मचारी चक्क त्याच्या बाजूला बसलेल्या एका महिलेच्या पाठीवर हात फिरवताना दिसला. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवर असेलल्या काही जणांनी शूट केली आहे.

कल्याणच्या रेल्वे स्थानकातील ४ नंबर फलाटावर एका महिलेची छेड काढताना चे दृश्य या व्हिडीओ तून स्पष्ट दिसून येत आहे.  संध्याकाळच्या सुमारास दोन महिला व त्यांच्याबरोबर एक लहान मुलं प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसलेले या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. दोघीपैकी एक महिला तिच्या लहान मुलाला दूध पाजत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्याचवेळी त्या महिलेच्या बाजूला बसलेला एक पोलीस कर्मचारी सगळी लाज सोडून त्या महिलेच्या पाठीवरून हात फिरवतानचं किळसवाणं कृत्य करताना पाहायला मिळतो आहे. त्या सर्व प्रवाशांच्या समोर उभे असलेल्या काही मुलांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून तो प्रकार सर्वाच्या समोर आणून दिला. पोलीसाकडून झालेलं हे कृत्य पाहून संतापलेल्या एका माणसाने पोलिसाला मारहाणही केली. पण तरीही तो पोलीस कर्मचारी निर्लज्जासारखं उलट उत्तर देत होता. पोलीस असल्याचा माज दाखवत माझ्यासोबतच तक्रार दाखल करायला चला, असं उर्मटाप्रमाणे उत्तर देताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो आहे. संबंधित पोलीस कर्मचारी दारू प्यायलाच एक महिला व्हिडीओमध्ये बोलतानाच ऐकायला मिळतं आहे. 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जातो आहे. व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करून या पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी केली जाते आहे. पण हा पोलीस नेमका कोण आहे ? याबद्दलची माहिती मिळालेली नाही.  व्हायरल झालेला व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर या आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या रेल्वे पोलीस या महिलेचा शोध घेत असून मोबाईलमध्ये व्हिडीओ टिपणाऱ्या युवकाचा शोध स्थानकावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrimeगुन्हा