आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर चढवली गाडी; कल्याणमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 16:19 IST2019-08-31T16:18:42+5:302019-08-31T16:19:09+5:30
पश्चिमेतील संतोषी माता परिसरात सराईत गुन्हेगार येणार असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 च्या डीसीपी स्कॉडला मिळाली होती.

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर चढवली गाडी; कल्याणमधील प्रकार
कल्याण : आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर आरोपींनी थेट गाडी चढवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी कल्याणात घडली. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पश्चिमेतील संतोषी माता परिसरात सराईत गुन्हेगार येणार असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 च्या डीसीपी स्कॉडला मिळाली होती. त्यानूसार या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा टियूव्ही गाडीतून संशयित आरोपी संतोषी माता रोडवरील एचडीएफसी बँकेजवळ आले. त्याचवेळी डीसीपी स्कॉडमधील अमोल गोरे हे ती गाडी थांबवण्यासाठी त्यांच्यासमोर येऊन उभे ठाकले. मात्र, आरोपींनी गाडी थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने थेट गोरे यांच्या अंगावर घातली आणि तिथून पळ काढला. ही गाडी अक्षरशः गोरे यांच्या अंगावरून नेण्यात आल्याने ते यात जबर जखमी झाले आहेत.