पब मध्ये हुक्का चालवणाऱ्या जीएसटी वर पोलिसांचा गुन्हा दाखल; विनयभंग आणि मारहाणीचा आरोप

By धीरज परब | Published: May 13, 2024 12:09 PM2024-05-13T12:09:50+5:302024-05-13T12:10:12+5:30

सदर पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून केल्या प्रकरणी पबचा बाउन्सर विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

Police file case against GST operating hookah in pub | पब मध्ये हुक्का चालवणाऱ्या जीएसटी वर पोलिसांचा गुन्हा दाखल; विनयभंग आणि मारहाणीचा आरोप

पब मध्ये हुक्का चालवणाऱ्या जीएसटी वर पोलिसांचा गुन्हा दाखल; विनयभंग आणि मारहाणीचा आरोप

मीरारोड - काशीमीरा नाका जवळ मुख्य रस्त्यावर गेट सेट टू नाईट ह्या पब - बार मध्ये सर्रास हुक्का पुरवला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाई वरून उघडकीस आले आहे . पोलिसांनी पबच्या मालकासह एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . सदर पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून केल्या प्रकरणी पबचा बाउन्सर विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

ह्या ठिकाणी मद्य व हुक्का पुरवला जातो तसेच नाच चालतो . पहाटे पर्यंत हा धिंगाणा सुरु असल्याने त्यावर कारवाई मात्र होत नसल्या बद्दल जागरूक नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते . त्यातच ग्रह महिलेच्या विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसां सह पालिकेच्या बारच्या बांधकाम बद्दलच्या भूमिके बद्दल नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. 

अखेर काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित लांडे व पथकाने सदर पब - बार वर छापा टाकला असता तेथे सर्रास हुक्का ओढणे सुरु होते . ग्राहकांना हुक्का आणि त्यासाठी आवश्यक साहित्य चालक व कर्मचारी यांच्या कडून उपलब्ध करून दिले जात होते. 

या प्रकरणी हुक्काचे ३८ काचेची भांडी , विविध हुक्का फ्लेवरचे डबे , पाईप , फिल्टर , कोळसा आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले . या प्रकरणी मालक अक्षय कुमार प्रवीण कुमार जैन रा.  भाईंदर याच्यासह व्यवस्थापक मिथुन भवरलाल जैन, अमित मिश्रा , जतीन आणि आफास विरुद्ध ग्राहकांना हुक्का पिण्यास उपलब्ध केल्याप्रकरणी तसेच त्याचे सामान बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

Web Title: Police file case against GST operating hookah in pub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.