शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:27 IST

आजचे उपोषण पुढे ढकलले; कृती समितीची माहिती

ठाणे : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांची पुरती वाताहत झाली आहे. मात्र, सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना अर्थसाह्य देण्यासह कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी रिक्षा, टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीने रविवारी ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय या चालकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. यामुळे ते आंदोलन काही दिवस स्थगित केल्याचेरिक्षा-टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनिल चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस दयानंद गायकवाड यांनी सांगितले.लॉकडाऊन कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आठ आॅटोरिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आॅटोरिक्षाचालक हे नैराश्येमध्ये जगत आहेत. त्यामुळे प्रत्येकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्याकाठी किमान पाच हजारांची आर्थिक मदत शासनाने द्यावी, आत्महत्याग्रस्त आॅटोरिक्षाचालकांच्या कुटुंबास १० लाखांची मदत ताबडतोब करावी, शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी मिळावी, आॅटोरिक्षाचालकांना कोविडयोद्धा म्हणून घोषित करून त्यांना ५० लाखांचे विमाकवच जाहीर करावे, कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी रिक्षाचालक उपोषणाला बसणार होते. मागण्या कधी मान्य होणार याकडे लक्ष आहे.