अश्लील वर्तन करणा-या बारबालांवर पोलिसांची कारवाई, ११ बारबालांसह १९ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 19:03 IST2017-11-22T19:03:09+5:302017-11-22T19:03:20+5:30
वागळे इस्टेट चेकनाका परिसरातील ‘सिझर पार्क’या बारमध्ये अश्लील चाळे करुन ग्राहकांचे लक्ष वेधणा-या ११ बार बालांसह मॅनेजरलाही वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली.

अश्लील वर्तन करणा-या बारबालांवर पोलिसांची कारवाई, ११ बारबालांसह १९ जणांना अटक
ठाणे: वागळे इस्टेट चेकनाका परिसरातील ‘सिझर पार्क’या बारमध्ये अश्लील चाळे करुन ग्राहकांचे लक्ष वेधणा-या ११ बार बालांसह मॅनेजरलाही वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. या कारवाईच्या वेळी हामालकाने मात्र पलायन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चेकनाका भागातील या ‘सिझर पार्क’ हॉटेलमध्ये अनैतिक कृत्ये होत असल्याची माहिती उपायुक्त यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. याच माहितीनुसार श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पंधारकर, सहायक पोलीस निरीक्षक के. जे. टोकले, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी कुलकर्णी, अश्विनी कांबळे, उमा गावडे, हवालदार व्ही. जी. परब, एस. बी. प्रधान, हवालदार जगन्नाथ शिंदे, वाल्मिक मांढरे, राजू जाधव आदींच्या पथकाने रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या बारवर धाड टाकली. त्यावेळी अश्लील व बिभत्स वर्तन तसेच हातवारे करुन ग्राहकांचे लक्ष विचलीत करणाºया तोकडया पेहरावातील बारबाला तिथे आढळल्या. याप्रकरणी बारचा व्यवस्थापक मोहन कुलाल, कर्मचारी राजेश जयस्वाल, मुनेश पाल, वेटर मुकेशकुमार यादव, रमाकांत दास, वादक संजय कदम, निलेश देवळेकर या आठ जणांसह ११ महिला वेटर्स (बारबाला) अशा १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम २९४ प्रमाणे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बारमध्ये ठेवून गिºहाईकांपुढे या बारबालांना अश्लील वर्तन करण्यास भाग पाडल्याप्रकरणी व्यवस्थापक कुलाल याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.