शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीनधारकांची दादागिरी थांबेना

By admin | Updated: January 21, 2016 02:29 IST

मत्स्यव्यवसाय विभागाचे कुठलेही नियंत्रण पर्ससीन नेटधारकांच्या बेकायदेशीर मासेमारीवर राहिले नसल्याने त्यांचा पालघर तालुक्यातील स्थानिक मच्छीमा

पालघर : मत्स्यव्यवसाय विभागाचे कुठलेही नियंत्रण पर्ससीन नेटधारकांच्या बेकायदेशीर मासेमारीवर राहिले नसल्याने त्यांचा पालघर तालुक्यातील स्थानिक मच्छीमारी क्षेत्रातील धुडगूस सुरूच राहिला आहे. सोमवारी वडराईच्या मच्छीमारी कव क्षेत्रात घुसून कवीची नासधूस केल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या छोट्या मच्छीमारांवर चालून जात त्यांच्या बोटी बुडवून टाकण्याची धमकी पर्ससीन ट्रॉलर्सनी दिल्याने सर्व मच्छीमारांना मासेमारी न करता रिकाम्या हाती परतावे लागले आहे.किनाऱ्यापासून १२ नॉटीकल मैल क्षेत्रापर्यंत राज्य शासनाची हद्द असून या भागात मासेमारी करण्यास पर्ससीन ट्रॉलर्सधारकांना बंदी आहे. अशा वेळी निषिद्ध क्षेत्रात घुसखोरी करीत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाई करण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त पालघर विभाग गस्ती नौका नसल्याचे कारण अनेक वर्षांपासून पुढे करीत असल्याने पर्ससीनधारकांना कारवाईची भीती उरली नाही. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने स्थानिक मासेमारी क्षेत्रात येऊन मोठ्या प्रमाणात मासे घेऊन जात आहेत. अशा वेळी स्थानिकांच्या कवीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शासनाकडून याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने आपल्या मत्स्यसंपदेची लूट उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय त्यांच्यापुढे कुठलाही पर्याय उरलेला नाही.सोमवारी (१८ जानेवारी) वडराई मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासद असलेली रमेश नारायण मेहेर यांची ‘विश्वसाई’ मोरेश्वर, रघुनाथ मेहेर यांची ‘अमरलक्ष्मी’, जितेंद्र धनु यांची ‘कावेरी’ चंद्रकांत नारायण मेहेर यांची ‘तेजस्विनी’, प्रल्हार धनू यांची ‘न्यू देवता’, अनिल धनू यांची ‘ओम साईश्रद्धा’, अशोक धनू यांची ‘शांता दुर्गा’ या २० ते २५ नौका वडराईच्या किनाऱ्यावरून समोर १० नॉटीकल क्षेत्रात आपल्या कवीवर मासेमारी करीत असताना मुंबईच्या कुलाबा धक्क्यावरून आलेल्या श्री साईची पालखी (आयएनडी-एमएच१-एमएम ६३८६), रामेश्वरी प्रसाद (आयएनडी-एमएच१-एमएम ९३३), माता वैष्णवीसाई (आयएनडी-एमएच७-एमएम १९६) या पर्ससीनधारक ट्रॉलर्सनी समुद्रात सोडलेले पर्ससीन जाळे वडराईतील कवीमध्ये (खुंटाला) अडकले, त्या वेळी आलेल्या जोरदार प्रवाहामुळे वडराईच्या मच्छीमारांच्या कवीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या नुकसानीचा व तुम्ही निषिद्ध क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी आल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडराईच्या स्थानिक मच्छीमारांना धमक्या देत पर्ससीनधारकांनी वायरलेस सेटवरून इतर सहकाऱ्यांना बोलवून घेतले. या वेळी झालेल्या बाचाबाचीनंतर पर्ससीन ट्रॉलर्सधारकांनी वडराईच्या मच्छीमारांच्या नौकाच्या अंगावर ट्रॉलर्स घालून बुडवून टाकण्याची धमकी दिल्याचे रमेश मेहेर या मच्छीमारांनी सांगितले. (वार्ताहर)