मुंबईच्या नायर रुग्णालयातून पळालेला रुग्ण भिवंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 02:00 IST2020-04-28T02:00:00+5:302020-04-28T02:00:17+5:30

या रुग्णाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारी याबाबत खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचा खुलासा केला आहे.

 A patient escapes from Mumbai's Nair Hospital in Bhiwandi | मुंबईच्या नायर रुग्णालयातून पळालेला रुग्ण भिवंडीत

मुंबईच्या नायर रुग्णालयातून पळालेला रुग्ण भिवंडीत

भिवंडी : मुंबईतील नायर रुग्णालयातून पळून आलेला शहरातील ५१ वर्षीय रुग्ण इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या रुग्णाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारी याबाबत खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचा खुलासा केला आहे.
रुग्णालयालगत असलेल्या भिवंडी महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहणाºया नागरिकांनी या रुग्णाला पाहिल्याने घबराट पसरली आहे. त्यांनीच ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी इंदिरा गांधी रुग्णालय (कोविड १९) चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हा रुग्ण नायर रुग्णालयातून बाहेर कसा आला? त्याला भिवंडीत कोणी आणून सोडले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. २२ एप्रिलला या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डायलेसिससाठी त्याला नायर रुग्णालयात पाठवले होते. या प्रकारामुळे वसाहतीतील कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title:  A patient escapes from Mumbai's Nair Hospital in Bhiwandi