शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

पप्पू कलानी हे शरद पवारांचे खरे पाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 6:22 AM

गणेश नाईक यांचे प्रतिपादन : उल्हासनगरात राष्ट्रवादीचा परिवर्तन मेळावा

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : पप्पू कलानी हे पक्षाचे नेते शरद पवार यांचे खरे पाईक असून कलानी कुटुंब पवार विचारधारेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गणेश नाईक यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन मेळाव्यात केले.

उल्हासनगरात राष्ट्रवादी निर्धार परिवर्तन मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, गणेश नाईक, संजीव नाईक, प्रमोद हिंदुराव आदी नेते उपस्थित होते. बहुतांश नेत्यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकारवर टीका केली. छगन भुजबळ यांनी, पंतप्रधान मोदी जुमलेदार झाल्याचे सांगून अच्छे दिन आनेवाले है, या वाक्यावर आता हशा पिकत असल्याचे सांगितले.

गणेश नाईक यांनी आ. ज्योती कलानी यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचा मुलगा ओमी आणि सून पंचम भाजपाच्या वाटेवर गेले असले, तरी ते स्वत: पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारधारेचे असल्याचे सांगितले. पप्पू कलानी हे शरद पवार यांचे पक्के पाईक असल्याचे सांगतानाच, नाईक यांनी ज्योती कलानी यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन यावेळी केले.कलानी महलवर मेजवानीपरिवर्तन मेळावा आटोपल्यानंतर जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, गणेश नाईक, चित्रा वाघ यांच्यासह इतर नेत्यांना पप्पू कलानी यांच्या कलानी-महलवर मेजवानी देण्यात आली होती. तत्पूर्वी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. अच्छे दिन आनेवाले है... या मोदी सरकारच्या जुमल्यावर आजकाल हशा पिकतो, असे ते यावेळी म्हणाले. इतर नेत्यांनीही यावेळी मोदी सरकारवर टीका केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस