शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पाडाळे धरणग्रस्तांचे मोबदल्यासाठी हेलपाटे, १६२ शेतकऱ्यांवर अन्याय, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 00:00 IST

धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत.

- श्याम राऊतमुरबाड : तालुक्यातील पाडाळे येथे भामखोर नदीवर ८० कोटी ७१ लाख खर्चून महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागाने २०१३ मध्ये धरण बांधण्यात आले. या धरणक्षेत्रातील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोबदला दिला असला तरी ज्या शेतक-यांनी कालव्यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते अद्याप मोबदल्यापासून वंचित आहेत. तीन वर्षे त्यांच्या नशिबी शासनदरबारी हेलपाटे सुरूच आहे.आतापर्यंत त्यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. त्यामुळे या धरणाचे पाणीच ग्रामस्थांनी रोखून धरल्यामुळे या परिसराला सिंचनाचाही फायदा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आत्महत्येची वाट पाहत आहात का, असा सवाल करत शेतक-यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.सरळगाव परिसरातील पाडाळे, ठुणे, माजगाव, मानिवली, कान्हार्ले, कळंभे, तळवली, नांदगाव, नागाव, पारतळे, सरळगाव आणि नेवाळपाडा या गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. या धरणाला १९८३-८४ ला मान्यता मिळाली तेव्हा त्याचा अंदाजित खर्च एक कोटी ७२ लाख १४ हजार रुपये होता. या धरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा या धरणाचा खर्च ८० कोटींहून अधिक रकमेवर पोहचला. टप्प्या-टप्प्यांमध्ये वाढ झालेल्या खर्चामुळे ठेकेदार मालामाल झाले, मात्र या धरणाच्या कालव्यांसाठी आपल्या उपजाऊ जमिनी देणारे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. तोंडी आश्वासन देऊ न कालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आल्या.मात्र काम पूर्ण झाले तरी त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बाधित शेतकरी संतप्त झाले असून तीन वर्षांपासून सतत अर्ज विनंत्या, उपोषण, अंदोलन करून थकले; पण भरपाई मिळालेली नाही.गेल्या वर्षी तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकºयांनी बेमुदत उपोषण आंदोलन केले. तेव्हा आमदार किसन कथोरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.कथोरे यांनी शेतकºयांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला आदेश दिले; मात्र या आदेशांनाही केराची टोपलीच मिळाली आहे. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी व काँग्रेसचे तालुका चिटणीस गुरु नाथ पष्टे यांनी तहसीलदारांना दिला आहे. तर पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली की ११ कोटी रु पये मंजूर असून खाजगी वाटाघाटींद्वारे हा प्रश्न सोडवला जाईल, असे नेहमीच उत्तर दिले जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले....तर आत्महत्या करावी लागेल!शासनातर्फे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मुरबाडचे तत्कालीन तहसीलदारांनी दोन वर्षांपूर्वी १६२ शेतकºयांना कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेतकºयांना वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मार्गावर शासन ढकलत असल्याचा आरोप मुरबाड तालुका काँग्रेसचे चिटणीस गुरुनाथ पष्टे यांनी केला आहे.पाडाळे धरणाचे कालव्यासाठी संपादित केलेल्या १६२ शेतकºयांचा प्रश्न खाजगी वाटाघाटीने सोडवला जाईल. यासाठी ११ कोटी रु पये मंजूर असून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल.- नीलकमल गवई  (उपविभागीय अभियंता, पाडाळे धरण) 

टॅग्स :Damधरणmurbadमुरबाड