शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा कोळीसमाजाचे तीव्र आंदोलन

By admin | Updated: November 10, 2015 00:04 IST

शहापूर तालुक्यातील खर्डी मधील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या जमिनी आणि घरे ही पिढ्यान्पिढ्या आहेत. परंतु या जमिनी फसवणूकीने आपल्या नावे करून घेणाऱ्या खर्डीच्या तत्कालीन

ठाणे : शहापूर तालुक्यातील खर्डी मधील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्या जमिनी आणि घरे ही पिढ्यान्पिढ्या आहेत. परंतु या जमिनी फसवणूकीने आपल्या नावे करून घेणाऱ्या खर्डीच्या तत्कालीन सरपंचाविरुद्ध कारवाई करून त्या मूळ मालकांना महिन्याभरात न दिल्यास राज्यभरात उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला.खर्डी येथील सरपंच दिलीप अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करून गावठाण जमिनी नावावर केल्याप्रकरणी स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाई होण्यासाठी आदीवासी कोळी समाज हक्क बचाव समितीने उपोषण केले. या उपोषणकर्त्यांची तरे तसेच शहापूर तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी भेट घेतली. यावेळी नायब तहसीलदार संदिप थोरात हेही उपस्थित होते. याच मागण्यांचे निवेदन यापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी शहापूर तहसीलदार यांना याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्याचे आदेश देऊन अहवाल सादर करायला सांगितला होता. परंतु १० दिवस झाले तरी तहसीलदारांनी चौकशी करण्यास दिरंगाई केल्याच्या निषेधार्थ हे उपोषण केले होते.यावेळी शहापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांची देखील त्यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन वरील मागण्या केल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष निखिल बेडकुळ, शंकर खाडे, दिपक पारधी, बाळकृष्ण सुकटे, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, ठाणे शहर संघटक योगेश कोळी, प्रशांत खर्डीकर, शहापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक हरेश पाष्टे, गजानन गोरे आणि शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आता तहसीलदार कोणती कारवाई करतात व त्यावर जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण महादेव कोळी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)