शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 05:38 IST

महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांना ‘लाडकी बहीण’ योजना बंद करायची आहे. सरकार आल्यावर ते सर्वांत आधी एकनाथ शिंदेंवर आगपाखड करत त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करतील, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासालाच फक्त आपले लक्ष्य मानते. मात्र, महाविकास आघाडी सरकार हे केवळ विकासकामांना थांबवणारे आणि लोकांची दिशाभूल करणारे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. त्यामुळे विकासकामांना रोखणाऱ्या अशा शत्रूंना सत्तेबाहेरच रोखा आणि महायुतीचे प्रामाणिक सरकार निवडून द्या, असे आवाहनही मोदींनी केले.  दरम्यान, पंतप्रधानांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा मराठीत केली. ही घोषणा करताना आनंद होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

येथील वालावलकर मैदानात आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ठाणेअंतर्गत मेट्रो, नवीन महापालिका मुख्यालय, उन्नत मार्ग विस्तार छेडा नगर ते ठाणे आनंदनगरपर्यंत या विकासकामांचे भूमिपूजन, मुंबई मेट्रो मार्ग ३ टप्पा एक लोकार्पण आणि ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोदी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटा, ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिराती शिवलिंग आणि दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा भेट दिली. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदिती तटकरे, शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. 

मविआमुळे मेट्रोचा खर्च वाढला

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले होते, असे नमूद करून मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीने खोडा घालीत मेट्रोचे काम अडीच वर्षे थांबवले. त्यामुळे या प्रकल्पाच्या किमतीत १४ हजार कोटींची वाढ झाली. मविआने बुलेट ट्रेन, राज्याची तहान भागवणाऱ्या योजना रोखल्या, त्यामुळे आता तुम्हाला यांना रोखायचे आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस सर्वांत बेइमान आणि भ्रष्ट पार्टी असल्याचा आरोपही मोदींनी केला. ⁠काँग्रेसचे चरित्र कधीच बदलत नाही. मोदींनी काँग्रेसशासित राज्यांमधील काही घोटाळ्यांचे दाखले दिले. ⁠

काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांसोबत

जेव्हापासून काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, तेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर आला. काँग्रेस शहरी नक्षलवाद्यांसोबत आहे, असा आरोप मोदींनी केला. त्यामुळे ते आता इतरांमध्ये फूट पाडून सत्तेत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर आपण विखुरलो तर ते आनंद साजरा करतील, त्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. 

ते लाडकी बहीण योजना बंद करतील

महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेला विरोध केला. त्यांना ही योजना बंद करायची आहे. सरकार आल्यावर ते सर्वांत आधी एकनाथ शिंदेंवर आगपाखड करतील आणि त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करतील, असा दावा मोदींनी केला. 

प्रकल्पांमुळे रोजगार संधी... 

मोदी म्हणाले की, आम्ही राज्याचा विकास करताना महाविकास आघाडीने केलेले खड्डे भरण्याचे काम करत आहोत. महाविकास आघाडीने ठाणे आणि मुंबईकडे दुर्लक्ष केले. वाहतूककोंडीकडे लक्ष दिले नाही. विकासकामे बंद केल्यामुळे मुंबई ठप्प होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, महायुतीचे सरकार आले आणि विकासकामांचा, वाहतुकीचा वेग वाढला. नवनवीन प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा