शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

चक्क नगरसेवकानेच मागितले कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:53 AM

आयुक्तांना दिले पत्र, १३ लाखांत भंगार साहित्य घेण्याची तयारी

मीरा रोड : महापालिकेच्या पथकाने कारवाईदरम्यान गोळा केलेले भंगार मिळवण्यासाठी प्रभाग समिती सभापतीनेच १३ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवल्याने नगरसेवकच थेट कंत्राट घेण्यास सरसावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.महापालिकेच्या प्रभाग समित्या असून प्रत्येक प्रभाग समितीनुसार फेरीवाला पथक नेमलेले आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्या हातगाड्या, बाकडे, लोखंडी स्टॅण्ड आदी साहित्य पालिका जप्त करते. जप्त केलेल्या साहित्याचा ई-लिलाव करण्यासाठी ३ सप्टेंबरला सूचना प्रसिद्ध केली होती. २४ सप्टेंबरला पालिकेने घेतलेल्या ई-लिलाव प्रक्रियेत दोघांनी बोली लावल्या होत्या. यात सर्वात जास्त साडेअकरा लाख रुपयांची बोली लावणाऱ्या कंत्राटदारास पालिकेने भंगार देण्यास मंजुरीची प्रक्रिया सुरू केली.ही बाब भाजपाचे नगरसेवक तथा प्रभाग-४ चे सभापती अरविंद शेट्टी यांना कळताच त्यांनी आयुक्त व उपायुक्तांनाच पत्र देऊन या भंगार साहित्यासाठी आपण १३ लाखांची बोली लावत असल्याचे कळवले. त्यामुळे अन्य निविदाधारकांपेक्षा आपली रक्कम जास्त असल्याने आपल्या निविदेचा विचार करावा, जेणेकरून महापालिकेसही फायदा होईल, असे शेट्टी यांनी पत्रात कळवले.आश्चर्य म्हणजे, शेट्टी यांच्या पत्रावर अतिक्रमण विभागाचे प्रमुख दादासाहेब खेत्रे यांनी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने पत्र निकाली काढण्यात येत आहे, असे कळवले. काही लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची पालिकेच्या कंत्राटामध्ये टक्केवारी तसेच काहीत भागीदारी असल्याची चर्चा होत असते. पण, शेट्टी यांनी थेट पत्र देऊनच कंत्राटासाठी बोली लावल्याने या टक्केवारीच्या आरोपांना बळ मिळाले आहे.पालिकेचा फायदा असल्याचा दावास्वत: शेट्टी यांनी मात्र महापालिकेचा फायदा करून द्यावा, म्हणून आपण १३ लाखांमध्ये कंत्राट घेण्यास तयार असल्याचे पत्र दिले, असे सांगितले. नगरसेवकाने थेट लेखी पत्र देऊन कंत्राट मागण्याचा प्रकार लाजिरवाणा आहे. हा भ्रष्टाचारच म्हटला पाहिजे. एकतर, कंत्राट मिळवण्यासाठी वा ज्या कंत्राटदाराला कंत्राट मिळणार आहे, त्यात आडेबाजी करण्यासाठीचा हा प्रकार असण्याची शक्यता माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर