ठाणे: एका पतपेढीसाठी दैनंदिन जमा होणारी रोकड असलेली बॅग घराच्या खिडकीतून चोरटयांनी लंपास करुन एक लाख १६ हजार २६० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना १२ डिसेंबर रोजी पहाटे २.४५ ते ५.४५ वा. च्या दरम्यान घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.वागळे स्टेट परिसरातील किसननगर भागात राहणारे तानाजी कुंभार (५७) हे पतपेढीच्या दैनंदिन ठेवीची रक्कम गोळा करण्याचे काम करतात. कुंभार यांनी ११ डिसेबर रोजी जमा झालेली रोकड एका बॅगेत ठेवन ती बॅग घरातील खिडकीजवळ ठेवली होती. ते रात्री झोपल्यानंतर चोरटयांनी खिडकीवाटे हात घालून ही बॅग चोरली. दरम्यान, कुंभार यांना आपल्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचे असल्याने ते बुधवारी पहाटे उठले. यावेळी त्यांना पैसे ठेवलेली बॅग जागेवर नसल्याचे आढळले. खिडकीही उघडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बॅग घराच्या बाहेर कुठेही नसल्याने कुंभार यांनी अखेर श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. २६ डिसेंबर रोजी कुंभार यांच्या मुलाचे लग्न आहे. तत्पूर्वीच चोरीची घटना घडल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे..................
पतपेढीच्या कलेक्शनची एक लाख १६ हजारांची रोकड चोरटयांनी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 21:02 IST
घरमालक झोपी गेल्यानंतर चोरटयांनी चक्क घराच्या खिडकीतून एक लाख १६ हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना ठाण्याच्या किसननगर भागात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
पतपेढीच्या कलेक्शनची एक लाख १६ हजारांची रोकड चोरटयांनी लांबविली
ठळक मुद्दे ठाण्याच्या किसननगरमधील घटनाश्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलखिडकीतून लांबविली बॅग