निझर जवळील हॉटेलचे शटर उचकवून 48,500 रुपयांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:12 PM2018-12-07T12:12:54+5:302018-12-07T12:13:05+5:30

नंदुरबार : शहरातील निझर रस्त्यावरील हॉटेलचे शटर उचकवून चोरटय़ांनी 48 हजार 500 रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. उपनगर पोलिसात ...

Rs. 48,500 cash lump sum by shutting down the hotel shutter near Nizar | निझर जवळील हॉटेलचे शटर उचकवून 48,500 रुपयांची रोकड लंपास

निझर जवळील हॉटेलचे शटर उचकवून 48,500 रुपयांची रोकड लंपास

Next

नंदुरबार : शहरातील निझर रस्त्यावरील हॉटेलचे शटर उचकवून चोरटय़ांनी 48 हजार 500 रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
निझर रस्त्यावर हॉटेल न्यू कल्याणी पॅलेस आहे. हॉटेल नेहमीप्रमाणे रात्री साडेदहा वाजता बंद झाले. रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी हॉटेलचे शटर उचकवून आतील गल्ल्यातील 48 हजार 500 रुपये रोख चोरून नेले. सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यावर लागलीच उपनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. 
पोलिसांनी पंचनामा केला. पंकज बन्सीलाल चौधरी यांनी फिर्याद दिल्याने   उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. तपास हवालदार वाघ करीत आहे.
दरम्यान, निझर रस्त्यावर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
 

Web Title: Rs. 48,500 cash lump sum by shutting down the hotel shutter near Nizar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.