शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 3:38 AM

आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे. जुलैपासून परिवहनला दररोज एक लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्यामुळे या सेवेची आर्थिक घडी बसण्याऐवजी आणखीच विस्कटत चालली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी केडीएमटी प्रशासनाने रस्ते सुरक्षा समितीला साकडे घातले आहे.मुंब्रा बायपास रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना कल्याण-डोंबिवलीतील वाहतुकीवर त्याचा ताण वाढला होता. १० सप्टेंबरला हा रस्ता पुन्हा सुरू झाला. त्यानंतर वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची सुटका होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर कल्याणचा जुना पत्री पूल रेल्वे प्रशासनाने पाडल्याने या पुलाला समांतर असलेल्या नव्या पुलावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. हा पूल अरुंद असल्यामुळे याठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. शीळच्या दिशेने पार मेट्रो मॉलपर्यंत वाहनांची रांग लागत असून कल्याणच्या दिशेने बैल बाजारपर्यंत वाहतूक कोंडी होती. या वाहतूक कोंडीमुळे कल्याण-पनवेलच्या बसफेºयांवर परिमाण होत आहे. तसेच नवी मुंबईच्या बस फेºयांना त्याचा फटका बसत असून पनवेलच्या चार फेºयांपैकी एक फेरी कमी होत आहे.कल्याण-बदलापूर मार्गावरील वालधुनी पूल, कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पूल, कल्याण-भिवंडी मार्गावरील खाडी पुलावर वाहतूक कोंडी होत असून बसफेºया कमी होत आहेत. त्यामुळे परिवहनचे दिवसाचे उत्पन्न एक लाखाने कमी होऊ न चार लाख २५ हजार रुपयांवर घसरले आहे. जुलैपासून आतापर्यंत केडीएमटीला एक कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीकडे साकडे घातले होते. तसेच कल्याणचे आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्यासह डोंबिवलीच्या वाहतूक पोलीस निरीक्षकांपुढेही हा विषय मांडण्यात आला होता. कल्याणच्या उड्डाण पुलावरही वाहतूक कोंडी होत असून डोंबिवलीतील अरुंद रस्त्यावर रिक्षाचालकांचे अतिक्रमण होत आहे. तेथे बस वळविताना चालकाला कसरत करावी लागते. परिवहनसोबत आरटीओ व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस लवकर बैठक घेणार आहेत, अशी माहिती परिवहनचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.निविदेला प्रतिसाद नाहीसध्या परिवहनकडे चालक-वाहक नसल्याने केवळ ७० बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनच्या ताफ्यातील जादा बस रस्त्यावर उतरविण्यासाठी व त्यातून उत्पन्नवाढीसाठी ७५ वाहक व १०० चालक भरतीसाठी निविदा मागविली होती. त्यासाठी आतापर्यंत सहा वेळा निविदा मागवून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.देखभाल-दुरुस्तीची निविदा काढून कंत्राटदाराने चालक-वाहक पुरविण्यासंदर्भात परिवहन व्यवस्थापनाचा विचारविनिमय सुरू आहे.नोव्हेंबरचा पगार मिळणार :परिवहनला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे चालक-वाहकांचे महिन्याचे पगार थकतात. नोव्हेंबरच्या पगाराची रक्कम महापालिकेने दिली असून दीड कोटीचा धनादेश परिवहनला मिळाला आहे. त्यातून लवकर कामगारांचे पगार केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण