शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी घातले एक लाख नऊ हजार सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:31 IST

भिवंडीतील नवभारत शाळेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन; आजी-माजी विद्यार्थ्यांनी लावली उपस्थिती

भिवंडी : भिवंडी शहरातील नवभारत इंग्लिश स्कूल या शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यामुळे या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शाळा ५१ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शुक्रवारी सकाळी शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांसह पालक यांच्या उपस्थितीत ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प शाळेने पूर्ण केला. यावेळी उत्साही विद्यार्थ्यांनी एकूण ८६ हजार ७०७ सूर्यनमस्कार घातले. यानंतर सूर्यनमस्काराची स्पर्धाही घेण्यात आली. त्या माध्यमातून एकूण एक लाख आठ हजार ९८९ सूर्यनमस्कार घालून हा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.भिवंडी शहरातील एनईएस शाळा ही नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. येथून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊ न वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. २०१८- १९ या शैक्षणिक वर्षात या शाळेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करताना असंख्य सामाजिक, शैक्षणिक उपक्र म राबवून या वर्षाची सांगता केली. शाळा ५१ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने सूर्यनमस्कार या अनोख्या भारतीय योग व व्यायाम उपक्र माचे आयोजन करून वर्धापनिदन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा महर्षी अरुण दातार, क्रीडा भारती संस्थेचे महामंत्री राज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर हेडा, उपाध्यक्ष डॉ. विवेक जोशी, कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल जोशी, विनोद शेटे, दासभाई पेटेल, मुख्याध्यापक संजय कालगावकर, मुख्याध्यापिका (प्राथ.) सुप्रिया अस्वले, भावीन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अरु ण दातार यांनी या उपक्र माबद्दल आयोजकांचे कौतुक करतानाच सूर्यनमस्कारचा आवश्यक असून त्यामुळे बुद्धी व मन प्रफुल्लित होऊन आपणास चालना मिळते, असे सांगितले. याप्रसंगी सूर्य उपासना व सूर्यनाम यांच्या महत्त्वाविषयी आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले.विद्यार्थ्यांपर्यंत सूर्यनमस्कार पोहोचवण्याचा उद्देशसध्याच्या जीवनशैलीमध्ये सूर्यनमस्कार युवा पिढी विसरत चालली आहे. भारतीय व्यायाम प्रकारातील सूर्यनमस्काराचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहचवणे, यासोबतच सध्या जीवनशैली बदलल्याने धावपळीच्या जीवनात असंख्य युवक मानसिक तणावासोबतच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांना बळी पडत आहेत. त्यांना आपल्या भारतीय व्यायाम प्रकारातील सूर्यनमस्कार शिकवण्याच्या उद्देशाने हा उपक्र म आयोजित केल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक जोशी यांनी दिली .