दीड लाख गणेशमूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:32 AM2019-09-02T00:32:15+5:302019-09-02T00:32:23+5:30

ठाण्यात एक लाख ४८ हजार घरगुती : तर १,०६८ सार्वजनिक बाप्पांचे होणार धूमधडाक्यात आगमन

One and a half lakh Ganesha idols today | दीड लाख गणेशमूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा

दीड लाख गणेशमूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा

Next

ठाणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे आगमन आज धूमधडाक्यासह मोठ्या उत्साहात होणार आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाºया या गणेशोत्सवासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली असून, सोमवारी ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांत (ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात) सुमारे दीड लाख गणेशमूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून सोमवारी सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. प्रतिष्ठापनेसाठी भटजीपासून पूजेसाठी लागणाºया साहित्याची जय्यत तयारी झाली आहे. त्यातच, सार्वजनिक मंडळांनी शहरांमध्ये रोषणाई केली आहे. अनेक भाविकांनी रविवारीच गणरायाच्या मूर्ती वाजतगाजत घरी आणल्या आहेत. बाप्पांचे आगमन म्हणजे घरोघरी एक प्रकारचा आनंदोत्सवच असतो. गेल्या वर्षी बाप्पाला निरोप देताना, पुढील वर्षी लवकर या, असे साकडे घालणारे सारेच गणेशभक्त नवीन वर्षात बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असतात. रविवारी अनेकांनी गणेशमूर्ती आणल्या असल्या, तरी त्यांची प्राणप्रतिष्ठा सोमवारीच होणार आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयात सुमारे एक लाख ४७ हजार ३६९ गणरायाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ठाणे शहरात १३७ सार्वजनिक, तर १९ हजार ३१५ घरगुती; भिवंडीमध्ये १६१ सार्वजनिक तर १०३५८ घरगुती; कल्याणमध्ये २८७ सार्वजनिक तर ४५ हजार १४१ घरगुती; उल्हासनगरात २८४ सार्वजनिक तर ४८१४१ घरगुती आणि वागळे परिक्षेत्रात १९८ सार्वजनिक आणि २४ हजार ५०४ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
दीड दिवसांचे ३९ हजार ९१२, तीन दिवसांचे १५६०, पाच दिवसांच्या २८ हजार ७२४, सहा दिवसांच्या १५ हजार ६५६ , सात दिवसांच्या २० हजार २८५, दहा दिवसांच्या सहा हजार ६०३, तर ११ दिवसांच्या ३३ हजार ६५२ घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे.

पाच हजार पोलीस राहणार तैनात : गणेशोत्सवासाठी स्थानिक पोलीस ठाण्यासह मुख्यालय आणि बाहेरूनही मागवलेला पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. यामध्ये चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, १८ सहायक पोलीस आयुक्त, १११ पोलीस निरीक्षक, ३४६ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, चार हजार ४१२ पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा एसआरपीएफ कंपन्या व ७०० होमगार्ड यांचा समावेश आहे. एकूणच उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे.


मुस्लिम कार्यकर्त्यांचीही लगबग

कुमार बडदे

मुंब्रा : बाप्पांच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्यांचीही (बांधवांची) लगबग सुरू असल्याचे दृश्य मुंब्य्रात ठिकठिकाणी दिसत आहे. सोमवारपासून सुरू होणाºया गणेशोत्सवासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बाप्पांच्या स्वागतामध्ये कुठलीही कमतरता राहू नये, यासाठी येथील अनेक मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. सजावट, स्टेज, बाप्पांची आसनव्यवस्था, मंडपातील अंतर्गत तसेच बाह्य सजावट तसेच सुरक्षाव्यवस्था व्यवस्थित झाली आहे की नाही, याची ते जातीने चौकशी करून काळजी घेत असल्याची माहिती मेहमूद खान या एका गणेश मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्याने लोकमतला दिली.

Web Title: One and a half lakh Ganesha idols today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.