उल्हासनगरात ओला चालकाला लुटले

By सदानंद नाईक | Updated: January 3, 2023 18:24 IST2023-01-03T18:23:57+5:302023-01-03T18:24:36+5:30

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसारगाव येथुन रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता तेजबहादूर यादव यांच्या ओला गाडीत दोन अज्ञात तरुण बसले.

Ola driver robbed in Ulhasnagar | उल्हासनगरात ओला चालकाला लुटले

उल्हासनगरात ओला चालकाला लुटले

उल्हासनगर : शहराबाहेर जाण्याच्या बहाण्याने ओला गाडीत बसलेल्या दोन अज्ञात तरुणांनीं ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून गुगल पे द्वारे ४३ हजार ७०० रुपयांना लुटले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसारगाव येथुन रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता तेजबहादूर यादव यांच्या ओला गाडीत दोन अज्ञात तरुण बसले. काही अंतरावर गेल्यावर गाडीचे भाडे देतो, असे सांगून गुगल पेचा पासवर्ड देण्याची मागणीयादव यांच्याकडे केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला. गुगल पेचा पासवर्ड घेऊन तीन वेळा एकून ३९ हजार रुपये काढले. तसेच चाकूच्या धाकाने शर्टच्या खिशातून ४ हजार ७०० रुपये काढून पोबारा केला. असे एकून ४३ हजार ७०० हजाराची फसवणूक केली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस अधिक तपास करीत
 

Web Title: Ola driver robbed in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.