शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून होतेय टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 01:39 IST

विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील अ‍ॅपसह आयोगाच्या ईमेलवर चालवल्या आहेत.

मीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर भररस्त्यात भाजपची प्रसिध्दी करणारे वाहन बेकायदेशीरपणे वापरले जात असताना, त्यावर कारवाई करण्यासाठी आचारसंहितेच्या भरारी पथकासह मीरा भार्इंदर विधानसभा मतदारसंघ व ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे अधिकारी एकेमेकांकडे बोटं दाखवून गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करत आहेत.विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील अ‍ॅपसह आयोगाच्या ईमेलवर चालवल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी, आचारसंहिता पथकासह विधानसभा मतदारसंघासाठी नेमलेले अधिकारी कार्यवाही करत नसल्याने किंवा दिशाभूल करणारा अहवाल पाठवत असल्याने आरोपांच्या फेºयात सापडले आहेत. याचा एक नमुना भार्इंदर पूर्वेला भाजपने उभ्या केलेल्या प्रचाराच्या एका गाडीवरुन पुन्हा अनुभवायला मिळाला. पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर साईबाबा रुग्णालयासमोर एक गाडी भाजपच्या प्रचाराचे स्टीकर लावून सजवून उभी करण्यात आली.या गाडीवर भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांची छायाचित्रे, तसेच पक्षाचा झेंडाही लावण्यात आला आहे. हा रस्ता वर्दळीचा असून, या मार्गाने मीरा भार्इंदर विधानसभा व ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील नागरीक, मतदार मोठ्या संख्येने येजा करत असतात.याबाबत आचार संहितेच्या भरारी पथकाच्या प्रमुख तथा पालिकेच्या प्रभाग अधिकारी दिपाली पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. आयोगाच्या ईमेल व सीव्हिजील अ‍ॅपवरदेखील तक्रारी करुन तक्रारदारांनी गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. मात्र दिपाली पवार यांनी ही गाडी त्यांच्या मतदारसंघात उभी असली तरी, त्यावरील छायाचित्रातील स्थानिक नेते मीरा भार्इंदर विधानसभा मतदारसंघातील असल्याचे कारण पुढे करुन तेथील अधिकाराऱ्यांकडे कारवाईसाठी ढकलले. इतकेच नाही तर, या गाडीच्या दावेदाराकडे विचारणा केली असता त्याने परवानगीसाठी अर्ज केल्याचेही पवार म्हणाल्या.परवानगी नसताना प्रचार चालवल्याने गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना अधिका-यांनी याप्रकरणी कारवाई टाळली. मीरा-भार्इंदरमधील संबंधित अधिकाºयांनी ही गाडी ओवळा-माजिवडा मतदारसंघात असल्याचे कारण सांगून त्यांनी कारवाई केली नाही.या प्रकरणातील एक तक्रारदार कृष्णा गुप्ता यांनी भरारी पथक, आचारसंहिता पथकासह दोन्ही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक अधिकारी हे आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांना ‘आदर्श’ संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. आपण आधीपासून आयोगासह शासनाकडेही तक्रारी केल्या होत्या की, पालिका आयुक्त व अधिकारी वर्ग हे आचारसंहितेचे उल्लंघन करण्यास मोकळे रान देतील. याप्रकरणी बेजबाबदार अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करुन आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.याबाबत भरारी पथकाच्या दिपाली पवार म्हणाल्या की, गाडी आमच्या हदद्दीत असली तरी त्यावरील उमेदवार हे मीरा भार्इंदर मतदारसंघातील असल्याने प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले आहे. या गाडीची आम्ही पाहणी करुन विचारणा केली असता, त्याच्याकडे परवानगी नव्हती, हे मात्र पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019