पकडल्यानंतरही अधिकारी मलईदार पदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:40 IST2020-02-22T23:40:41+5:302020-02-22T23:40:55+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेतील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी लांबलचक आहे. लाच घेताना पकडले गेल्यानंतरही हे अधिकारी वजनदार नेते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचा वापर करून पुन्हा मलाईदार पदांवर बसतात.

पकडल्यानंतरही अधिकारी मलईदार पदावर
- धीरज परब
मीरा-भाईंदर महापालिकेतील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी लांबलचक आहे. लाच घेताना पकडले गेल्यानंतरही हे अधिकारी वजनदार नेते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचा वापर करून पुन्हा मलाईदार पदांवर बसतात. पुन्हा महत्त्वाच्या पदावर बसवल्यानंतर अनेक तक्रारी होऊनही राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाकडून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही लाचखोरांना अकार्यकारी पदावर नियुक्त करा, अशी खानापूर्ती केली जाते. गेल्या १८ वर्षांत १९ पालिका अधिकारी, कर्मचारी लाचखोरीच्या गुन्ह्यात सापडले आहेत.
चंद्रकांत बोरसे, संजय दोंदे, सुनील यादव, दिलीप जगदाळे, डॉ. रुंदन राठोड, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. संजीवकुमार गायकवाड, प्रशांत जानकर, नितीन राठोड या अधिकाºयांसह उपशिक्षक अनिल आगळे, बालवाडी शिक्षिका अलका पाटील, लिपिक आनंद गबाळे, दशरथ हंडोरे, गणेश गोडगे, महादेव बंदिछोडे, प्रशांत कोळी, राकेश त्रिभुवन, कुंदन पाटील, योगेश शिंदे अशी लाचखोरांची यादी मोठी आहे. पण, आजपर्यंत एकाही लाचखोरास शिक्षा झालेली नाही. लाच घेताना पकडलेले नगरसेवक नरेंद्र मेहता, वर्षा भानुशाली, वंदना चक्रे, अशोक तिवारी, सॅण्ड्रा रॉड्रिक्स, कमलेश भोईर अशी यादी आहे. यातील मेहता, भानुशाली, तिवारी यांना तर नंतर मोठमोठी पदं मिळाली.