शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी निवड; भाजपात धुसफूस

By admin | Updated: February 15, 2016 03:00 IST

एक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यां

जितेंद्र कालेकर,  ठाणेएक महिन्यापूर्वी ठाणे शहर भाजपाने जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीवरून नाराज कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकमान्यनगर येथील पदाधिकारी कामताप्रसाद शर्मा यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडेच तक्रार केली असून न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. लोकमान्यनगर- सावरकरनगर मंडळाच्या अध्यक्षांची निवडणूक १४ जानेवारी २०१६ रोजी पार पडली. यामध्ये आदेश भगत, योगेश भोईर आणि कैलास म्हात्रे या निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात न घेता मंडळ अध्यक्ष म्हणून सचिन मोरे यांचे नाव जाहीर केले, असा आरोपही शर्मा यांनी केला. २३ वर्षांत अशी निवडणूक झाली नाही. जुने मंडळ कार्यकर्ते, अध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच इच्छुकांना डावलून ही नियुक्ती केल्याने नाराज झालेले शर्मा तसेच लक्ष्मीकांत पाठारे, राकेश गुप्ता, मुकुंद काळे अशा सुमारे २२ कार्यकर्त्यांचा गट एकवटला आहे. त्यांनी ही नाराजी प्रदेशाध्यक्षांसह ठाणे विभागाध्यक्ष खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर आणि नेते रवींद्रनाथ आंग्रे यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुळात, वॉर्ड कमिटी झाल्याशिवाय मंडळ अध्यक्षाची घोषणा होत नाही. लोकमान्यनगर विभागात वॉर्ड ९ अ आणि ब, १३ ब, १५ ब तसेच २६ ब अशा पाच वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती केली नसून वॉर्ड १० च्या अध्यक्षांच्या नियुक्तीलाही आक्षेप घेतला आहे. वॉर्ड १६ मधून नीरज मिश्रा, १५- अमित सिंग, १३ विजय दुबे, २६ किरण दतुरे आणि १४ मुक्तानंद सिंग अशा १४ पैकी केवळ सहा वॉर्ड अध्यक्षांचीच नियुक्ती झाली आहे. सर्व अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच मंडळ अध्यक्षांची निवड केली जाते. आठ जणांची निवड बाकी असतानाही मंडळ अध्यक्षांची निवड झाल्याने ही नाराजी आहे. मुळात, बुथप्रमुखांच्या नियुक्तीमध्येच मंडळ अध्यक्षांचे नाव घोषित करण्यात आले.