शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

कागदी पिशव्यांच्या निर्मितीसाठी आता केला जाणार नगरसेवक निधीचा वापर, प्रस्ताव महासभेत मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:28 IST

एकीकडे प्लास्टीक पिशव्यांचा वापर आजही सुरु असतांना पालिकेकडून आता कागदी पिशव्यांसाठी नगरसेवक निधीला कात्री लावली जाणार आहे. नगरसेवकांनी याला मंजुरी दिली आहे. मात्र प्लास्टीक पिशव्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्लास्टीक पिशव्यांवरील कारवाईसाठी नगरसेवक आक्रमककारवाईचा फास आवळणार पालिका

ठाणे : प्लास्टिक पिशव्यांवर सतत कारवाईचा दावा पालिका प्रशासन करीत असले तरी आजही शहरात अनेक भागात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी केला. मार्केट, हातगाड्या, दुकानांमध्ये या पिशव्यांचा वापर सुरू असून प्लास्टिकच्या पिशव्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेवक निधीतून कागदी पिशव्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.                  प्रशासनाच्या वतीने मात्र जून २०१८ ते ०९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई करून २० हजार ५०० किलोच्या पिशव्या जप्त केल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्यानंतर नागरिकांमध्ये कागदी आणि कपड्यांच्या पिशव्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी नगरसेवक निधीमधून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आला होता. या अनुषंगाने चर्चा करतांना या कामासाठी निधी देण्यास नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारची हरकत नोंदवली नसली तरी प्लास्टिकच्या पिशव्यांवर होणारी कारवाई संथ गतीने सुरू असल्याचा आक्षेप नोंदवला. प्रदूषण मंडळाने खरोखरच प्लास्टिक विरोधी मोहिमे तीव्रपणे राबवली असती तर आज ठाणे महापालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी प्रमाणात दिसून आला असता. देशात नोटबंदी होऊ शकते तर ठाण्यात प्लास्टीकबंदी का होत नाही असा सवाल यावेळी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला. तर ठाण्यात अजूनही अनेक ठिकाणी प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर सर्रासपणे सुरू असल्याची माहिती नगरसेविका शिल्पा वाघ यांनी दिली. वागळे, भाजी मार्केट, उथळसर येथे सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर दिसत आहे. जोपर्यंत दुकानदारांवर प्लास्टिक विक्रीच्या विरोधात सक्त कारवाई होत नाही तोपर्यंत रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांवर सर्रासपणे त्या दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कापडी आणि कागदी पिशव्या तयार करण्यासाठी नगरसेवक निधी देण्यासाठी कोणत्याच नगरसेवकांची काहीही हरकत नसली तरी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार नसेल तर अशा उपक्र मांचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लोकप्रतिनिधींच्या आरोपांना उत्तर देताना पालिका उपायुक्त ओमप्रकश दिवटे यांनी शहरात प्लास्टिकच्या पिशव्यांवर केलेल्या कारवाईची माहिती सभागृहात दिली. प्लास्टीकबंदीच्या शासन नियमानुसार ९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सुमारे २० हजार ४५८ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी प्रभाग समितीनिहाय पथक नेमले असून या पथकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकच्या वापर करणाऱ्यांवर कारवाई सुरूच असून लोकप्रतिनिधींच्या म्हणन्यानुसार जर प्लास्टिकचा पिशव्यांचा वापर अजूनही काही ठिकाणी सुरू असल्यास कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.* नगरसेवक निधीतून कागदी पिशव्यांची निर्मितीप्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी आणि कागदी तसेच कापडी पिशव्यांचा वापर वाढावा यासाठी या पिशव्या तयार करण्यासाठी नगरसेवक निधी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये या पिशव्या तयार झाल्यानंतर किफायशीत दारात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. या पिशव्या कोण विकणार असा प्रश्न मिलिंद पाटणकर यांनी उपस्थित केला. या पिशव्या नगरसेवकांच्या निधीतून तयार करणार आणि यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची भर प्रशासनाकडे पडणार. यापेक्षा या कागदीपिशव्यांचे वाटप मोफत करण्याविषयीची सूचना पाटणकर यानी महापौरांना केली. त्यावेळी सभागह नेते नरेश म्हस्के यांनी प्रशासनाच्या गोषवाºयातून किफायतशीर दरात विक्री हा शब्द काढून टाकण्यास सांगितले.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी