आता शास्त्रीनगर रुग्णालयातही होणार शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 19:36 IST2019-07-05T19:32:52+5:302019-07-05T19:36:22+5:30

प्राथमिक मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री चव्हाण यांनी दिली.

Now Shastri Nagar hospital will be do post portem | आता शास्त्रीनगर रुग्णालयातही होणार शवविच्छेदन

आता शास्त्रीनगर रुग्णालयातही होणार शवविच्छेदन

ठळक मुद्दे शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या समितीची बैठक शास्त्रीनगर रुग्णालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शवविच्छेदन केंद्रासाठी जागेची पाहणी करून प्राथमिक मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री चव्हाण यांनी दिली.

डोंबिवली - येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डोंबिवली परिसरातील मृतांचे शवविच्छेदन केंद्र सुरु करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या समितीची बैठक शास्त्रीनगर रुग्णालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, शहर अभियंता व कडोंमपाचे पदाधिकारी, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत शवविच्छेदन केंद्रासाठी जागेची पाहणी करून प्राथमिक मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री चव्हाण यांनी दिली.

Web Title: Now Shastri Nagar hospital will be do post portem