शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सोसायट्यांची पुन्हा करणार कचराकोंडी; ४२५ सोसायट्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 2:08 AM

ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे.

ठाणे : प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्तकचऱ्याची निर्मिती करणाऱ्या, तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. मागील वर्षी राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षभर लांबणीवर पडला होता. मात्र, आता पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषगांने कचरा विल्हेवाटीचे हत्यार पुन्हा बाहेर काढले आहे. यानुसार येत्या १५ दिवसांत तत्काळ कचरा विल्हेवाटीचा प्रश्न या सोसायट्यांनी मार्गी लावावा अन्यथा त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा इशाराच नोटिसींद्वारे दिला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर देशातील इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करावेत यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने यासंदर्भात दोन वर्षापूर्वी एक आध्यादेश काढून ज्या सोसायटी अथवा आस्थापनांकडून प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त कचरा निर्मिती होते.

तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे. यानुसार ठाणे महापालिकेने सर्व्हे करून तब्बल ४२५ हून अधिक सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा विषय गाजला होता. त्यावेळेस महासभेतही यावर सदस्यानी आवाज उठविला होता. त्यानंतर सोसायटीधारकांना ऑक्टोबरपर्यंतची मुदतही दिली होती. परंतु, त्यावेळेस झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण बासणात गुंडाळण्यात आले होते.

या मोहिमांचे काय झाले?

मध्यतंरी कचºयाची विल्हेवाट न लावल्यास पालिकेने संबधींताविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असेही सांगितले होते. तसेच शुन्य कचरा मोहीम सुू केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. शिवाय ज्या सोसायटी कचºयाची विल्हेवाट लावून खत तयार करतील त्यांच्या खताचे ब्रँडिंग करून बाजार उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती. परंतु, या मोहिमा कागदापलिकडे पुढे सरकलेल्या नाहीत.

१५ दिवसांची मुदत 

आता वर्षभरानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने पुन्हा हे हत्यार बाहेर काढले असून अशा सोसायटी आणि इतर आस्थापनांना नोटीस बजावण्याची मोहीम सुरू केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून या नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या १५ दिवसांत या आस्थापनांनी कचºयाची विल्हेवाट लावली नाही तर त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा तातडीचा इशारा यामध्ये दिला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र