शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

आमदारांना नव्हे, कार्यकर्त्यांना नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 02:24 IST

नेता जाणकार असला तर कार्यकर्तेही जाणकार होतातच असे नाही. नेत्याच्या छायेखाली लढवलेली प्रत्येक निवडणूक ही विजयासाठी वर्ग करता येत नाही याची अनुभूती अंबरनाथ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांना आली आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : नेता जाणकार असला तर कार्यकर्तेही जाणकार होतातच असे नाही. नेत्याच्या छायेखाली लढवलेली प्रत्येक निवडणूक ही विजयासाठी वर्ग करता येत नाही याची अनुभूती अंबरनाथ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांना आली आहे. आमदार किसन कथोरे यांचे नाव पुढे करून प्रत्येक निवडणूक जिंकता येईलच असे नाही. निडणूक जिंकण्यासाठी नेत्यासोबत कार्यकर्त्यांनीही नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.मात्र भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे नेहमी कथोरे यांच्या नावावर यश मिळवण्याचे प्रयत्न करत असल्याने यंदा अंबरनाथ तालुक्यातील मतदारांनी या कार्यकर्त्यांना एकाकी पाडले. भाजपाचा झालेला पराभव हे नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना आत्मचिंतनासाठी महत्वाचे ठरणार आहे. आमदार कथोरे यांची वैयक्तिक निवडणूक आणि इतर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो. कथोरे यांच्या सोबत राहून गावागावात काम करणाºया कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणुकीत यश मिळवले होते. कथोरे यांचे वर्चस्व असलेल्या अंबरनाथ तालुक्यात यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत इतका रोष आला कुठून हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र या निवडणुकीत आमदारांचे अपयश आहे की आमदारांच्या छत्रछायेखाली आपली राजकीय वाटचाल ठरवणाºया पदाधिकाºयांची निष्क्रियता आहे याची चाचपणी करण्याची वेळ आता भाजपावर आली आहे.विधानसभा निवडणुकीत २५ हजारापेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळवणारे आमदार कथोरे यांना यंदाची जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक अडचणीची ठरली आहे. जे मतदार कथोरेंना भरभरुन मते देत होते त्याच गावांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांना मते मिळाली नाही हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. आमदारांचे नाव पुढे करून राजकीय समीकरणे याआधी रचली गेली. त्यात त्या पदाधिकाºयांना यशही मिळाले. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी चमकोगिरी करणाºयांना जागा दाखवण्याचे काम केले आहे. गावागावात नेते बनून फिरणाºया उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.आधी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपासोबत गेलेले कथोरे यांना शह देण्याचा प्रयत्न प्रत्येकवेळी शिवसेनेच्यावतीने झाला. मात्र प्रत्येकवेळी शिवसेना तोंडघशी पडली. यंदा शिवसेनेने कथोरे यांच्याऐवजी भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांना लक्ष्य करून निवडणूक लढवली.गावागावात संपर्कात असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवत शिवसेनेने भाजपाला टक्कर दिली. शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी एकत्रित येऊन काम करत असल्याने सेनेची ताकद वाढली होती. तर भाजपाचे कार्यकर्ते हे केवळ कथोरेंचे नाव पुढे करून आपल्या वाट्याला यश मिळवण्याचे प्रयत्न करत होते. मात्र भाजपा उमेदवारांचा हा डाव यंदा मतदारांनी हाणून पाडला. आजही गावागावात कथोरे यांनी केलेल्या कामाची चर्चा असली तरी कथोरेंच्याभोवती भटकणाºया कार्यकर्त्यांना मात्र मतदारांनी कदापि स्वीकारलेले नाही.तीन ते चार वर्षात शिवसेनेने तालुक्यात आपला जम चांगला बसवला आहे. ग्रामपंचायत निवडणुका जिंकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास हा आधीच वाढलेला होता. त्यात भर पडत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जिंकत सेनेने तालुक्यात वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेला आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आणि कथोरे समर्थकांना गावागावात पोहचण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.सभापतीपदीशिवसेनेला संधीअंबरनाथ तालुक्याच्या पंचायत समितीवर शिवसेना - राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य असल्याने शिवसेनेच्या वाट्याला सभापतीपद जाणार आहे. तर उपसभापतीपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल. तर भाजपाला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणे