"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:05 IST2025-11-21T16:01:19+5:302025-11-21T16:05:03+5:30

ठाण्यात वर्चस्व कोणाचे यावरून आता महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील हे राजकीय युद्ध हाणामारीपर्यंत पोहोचलं आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांने शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.

"No one came then, now they came to do stunts, but I was beaten...", former BJP corporator told what happened? | "तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?

"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातच आता शिवसेनेची गळचेपी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारीच गळाला लावल्याने हा वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर आता शिवसेनेचे शाखाप्रमुख हरेश महाडिक, उप विभागप्रमुख महेश लहाने यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याची तक्रार दिली. पण, या प्रकरणावर भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार आरोप फेटाळले आहेत.

भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हे प्रकरण चर्चेत असताना नारायण पवार यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला.

चुकीची माहिती देऊन गुन्हे दाखल करताहेत

नारायण पवार म्हणाले, "इथल्या नागरिकांना एक टक्का स्टॅम्प ड्युटी लागणार होती. आता ती १०० रुपये लागणार म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करायला गेलो होतो. त्या १८५ कुटुंबांसाठी मी मेहनत घेतली. तेव्हा कुणी आले नाही. आता स्टंटबाजी करायला आले आहेत."

"तिथे कुठेच जल्लोष नव्हता. मी काही कुणाला मारहाण केली नाही. काही लोक आता चुकीची माहिती देऊन गुन्हे दाखल करत आहेत. आम्ही महायुतीमध्ये आहोत. युती झाली तर आम्ही युतीत लढणार आहोत. आम्ही वादावादी करणार नाही. नरेश म्हस्के जेव्हा खासदारकीसाठी उभे होते, तेव्हा आम्ही त्यांचा प्रचार केला होता", असा खुलासा नारायण पवार यांनी केला.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप काय?

बीएसयूपी घरांना शंभर रुपये नोंदणी शुल्क जाहीर करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी याचे सेलीब्रेशन करण्यासाठी गेले होते. पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये सेलिब्रेशन केले जाणार होते, पण, तिथे भाजप माजी नगरसेवक नारायण पवार आले आणि सेलिब्रेशन कसे करता म्हणत मारहाण केली? असा शिंदेंच्या तक्रार दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या प्रकरणावरून शुक्रवारी पडसाद उमटले. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षही यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Web Title : ठाणे: बीजेपी के पूर्व नगरसेवक ने मारपीट के आरोपों का खंडन किया

Web Summary : ठाणे में तनाव के बीच, शिवसेना गुट ने बीजेपी के पूर्व नगरसेवक नारायण पवार पर उत्सव के दौरान मारपीट का आरोप लगाया। पवार ने आरोपों का खंडन करते हुए कहा कि झूठे आरोप और राजनीतिक चालें हैं, और महायुति गठबंधन की एकता पर प्रकाश डाला। इस घटना ने सत्ता संघर्ष पर बहस छेड़ दी।

Web Title : Thane BJP ex-corporator denies assault claim amid political tensions.

Web Summary : Amidst tensions in Thane, a Shiv Sena faction accuses a BJP ex-corporator, Narayan Pawar, of assault during a celebration. Pawar denies the charges, claiming false accusations and political maneuvering, highlighting Mahayuti alliance unity. The incident sparks debate over ongoing power struggles.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.