राज्य सरकारचे कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष, नितीन सरदेसाई यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 15:44 IST2020-08-01T15:44:19+5:302020-08-01T15:44:43+5:30
ठाणे - ठाण्यात मनसेच्यावतीने कोकणात गणपतीला जाण्यासाठी १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. या साठी फॉर्म द्यायची सुरुवात शनिवारी ...

राज्य सरकारचे कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष, नितीन सरदेसाई यांची टीका
ठाणे - ठाण्यात मनसेच्यावतीने कोकणात गणपतीला जाण्यासाठी १०० बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. या साठी फॉर्म द्यायची सुरुवात शनिवारी पासून मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अभिजित पानसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात करण्यात आली. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात फॉर्म वाटप करण्यात आले. यंदा कोविडची पार्श्वभूमी असली तरी कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी गावी जमायचे वेध लागले आहार.सरकारने त्यांची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने मनसेचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी व्यवस्था केली आहे. ठाण्यातून 100 मोफत बसेस सोडले जाणार आहेत. त्याचा शुभारंभ आज केला असे सरदेसाई यांनी सांगितले. सरकारने कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली.