ठाण्यात एलपीजी सिलिंडरच्या भडक्यात नऊ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 22:38 IST2018-10-06T22:36:50+5:302018-10-06T22:38:50+5:30
जखमींवर लोकमान्य आणि ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

ठाण्यात एलपीजी सिलिंडरच्या भडक्यात नऊ जखमी
ठाणे: वागळे इस्टेट इंदिरानगर येथे एका घरात ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरचा भडका उडाल्यानं नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना लोकमान्य आणि ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फ्लोरिंगचं काम सुरू असल्यानं एलपीजी सिलेंडर आणून ठेवण्यात आले होते. सुदैवानं त्यांचा भडका उडाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
एलपीजी सिलिंडरचा भडका उडाल्यानं एकूण नऊ जण जखमी झाले. यामध्ये मखबुल खान (29), गोमती शर्मा (50), कमलावती शर्मा (45), नारायण शर्मा(10) आणि शिवा शर्मा (12), बळीराम भंडारे (60), कल्पेश रेडेकर, (22) आदित्य लहाने (19) आणि शमशाद सिद्दीकी (19) यांचा समावेश आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौरांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.