तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, कल्याणजवळच्या 14 गावांना हादरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 13:44 IST2018-10-29T10:41:15+5:302018-10-29T13:44:43+5:30

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे.

New Mumbai : explosion in Taloja MIDC company | तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, कल्याणजवळच्या 14 गावांना हादरे

तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, कल्याणजवळच्या 14 गावांना हादरे

नवी मुंबई/कल्याण : तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खणताना सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये जेसीबी चालवणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.अग्निशमन दलदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे कल्याणजवळच्या 14 गावांना भूकंपसदृश्य हादरे बसले आहेत. अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून भीतींना तडेदेखील गेले आहेत.

- आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली.



 



 



 

 

Web Title: New Mumbai : explosion in Taloja MIDC company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.