शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

मेट्रो पाचची साधी निविदा प्रक्रियाही नसतांना भुमीपुजनचा घाट कशासाठी, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:09 IST

मेट्रो पाचच्या भुमीपुजनाचा वाद आणखी वाढला असून, या वादात आता राष्ट्रवादीने सुध्दा उडली घेतली आहे. या मेट्रोची अलायमेंटच चुकीची झाली असल्याचा दावा ठाणे शहर राष्ट्रवादीने केला असून मेट्रोचा मार्ग केवळ भाजपाच्या खासदारासाठीच वळविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमतदारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे कामकेवळ भाजपाच्याच खासदारासाठीच मेट्रो पाचच अट्टाहास

ठाणे - मेट्रो पाचचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. परंतु या मेट्रोची साधी निविदा प्रक्रियाही सुरु झालेली नाही, त्याबाबत अद्याप अंतिम धोरण निश्चित झाले नसतांना त्याचे भुमीपुजन कसे काय असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर मेट्रोची अलायमेंट ही वास्तविक पाहता, कळवा, मुंब्रा, शीळ, डोंबिवली, कल्याण एपीएमसी अशी असणे अपेक्षित असतांना भिवंडी मधून करण्यात आलेली अलायमेंट ही केवळ भाजपाच्या खासदारासाठीच करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.                             एकीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भुमीपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला येत असतांना, दुसरीकडे कळवा आणि मुंब्रा वासियांवर अन्याय का? अशा आशयाचे फलक लागले असतांना या मेट्रो पाचच्या मार्गाची अलायमेंटच चुकीच्या पध्दतीने झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. या संदर्भात यापूर्वी सुध्दा संबधींताबरोबर चर्चा झाली होती. मेट्रो पाचच्या सध्याच्या मार्गाने केवळ २ लाख २९ हजार प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. परंतु हीच मेट्रो जर कापुरबावडी वरुन पुढे कळवा, मुंब्रा, शिळ, डोंबिवली मार्गे कल्याण एपीएमसी मार्केटला नेली असती तर त्याचा फायदा मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुध्दा झाला असता. परंतु ज्या ठिकाणी प्रवासी नाहीत, त्याठिकाणाहून ही मेट्रो नेली जात असल्याचा आरोप परांजपे यांनी केला आहे. केवळ भाजपाच्या खासदारासाठीच मेट्रोचा मार्ग हा उलट्या दिशेने आखला गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपाचा डाव - जितेंद्र आव्हाडहा मार्ग उलट्या दिशेने फिरविणे म्हणजे भाजपाने एक प्रकारे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाच केलेला हा प्रयत्न म्हणावा लागणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला लगावला. या गोष्टीकडे पालकमंत्री तसेच कल्याणच्या खासदारांनी लक्ष घालायला हवे होते. परंतु त्यांना सुध्दा ही गोष्ट कशी कळली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला जर याचा अभ्यास नसेल तर मतभेद विसरुन परांजपे यांच्याकडून अधिक अभ्यास करुन घ्यावा असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे या मेट्रोचे मोनो होणार असून केवळ लॉस देणारी ही मेट्रो ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भुमीपुजन करतांना किमान निविदा प्रक्रिया तरी पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु ते न करता केवळ मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा भाजपाने केलेला हा केवीलवाना प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Metroमेट्रोtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड