शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचा घंटानाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 15:20 IST

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठाणे  - गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींवरील बलात्कार, विनयभंगांच्या गुन्ह्यांची संख्या वाढीस लागली आहे. गुन्हेगारांवर राज्याच्या गृहखात्याचा वचक नसल्यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद तसेच थाळी नाद केला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी, राधाबाई जाधवर, अनिता किणे, अंकिता शिंदे, आरती गायकवाड यांच्यासह युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, विजया दामले, मेहरबानो पटेल, शशी पुजारी, अनिता मोठे, पूनम वालिया, स्मिता पारकर, कांत गपमल, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, गीता शिंदे, भानुपती पाटील, इंदू भोसले, सुविणा भिलारे, पुजा जाधव आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी सुजाता घाग यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या काळात आता महिला व मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इतकेच नाहीतर महिलांना सुरक्षा देण्यात सरकार हतबल ठरले आहे. त्यामुळे असुरक्षिततेच्या वातावरणामुळे भयभीत झालेल्या व अत्याचारपीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार असून, यासाठी प्रत्येक महिलेने पेटून उठणे गरजेचे आहे. तसेच, सरकारनेही या नराधमांवर वचक प्रस्थापित केला पाहिजे. जर, अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच गळ्यात घंटानाद करु, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाthaneठाणे