जेंव्हा मंत्री जितेंद्र आव्हाड फुटबॉल खेळतात! VIDEO मध्ये बघा कशी मारली किक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:14 IST2022-01-24T18:09:34+5:302022-01-24T18:14:26+5:30
ठाण्याच्या कळवा परिसरातील तरुणांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी शहरातून बाहेर जावे लागत होते. या परिसरात खेळाडूंच्या फुटबॉल प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानीक नगरसेविका अपर्ण साळवी यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता.

जेंव्हा मंत्री जितेंद्र आव्हाड फुटबॉल खेळतात! VIDEO मध्ये बघा कशी मारली किक
ठाणे- राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते येथील कळवा परिसरात फुटबॉल टर्फचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांना फुटबॉल खेळण्याचा मोह आवरता आला नाही.
ठाण्याच्या कळवा परिसरातील तरुणांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी शहरातून बाहेर जावे लागत होते. या परिसरात खेळाडूंच्या फुटबॉल प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानीक नगरसेविका अपर्ण साळवी यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर माजी नगरसेवक मनोहर साळवी यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर महापालिकेत ठराव मंजूर करून कळवा येथील मनीषा नगर परिसरात फुटबॉलचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना फुटबॉल टर्फ उपलब्ध करून देण्यात आले.
जेव्हा मंत्री जितेंद्र आव्हाड फुटबॉल खेळतात...! #JitendraAwhad#footballpic.twitter.com/SRUz2icVWk
— Lokmat (@lokmat) January 24, 2022
या फुटबॉल टर्फचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांना फुटबॉल खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनीही फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. प्रत्येक नगरसेवकाने अशा प्रकारे आपल्या प्रभागात खेळाडूंना मैदान अथवा टर्फसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास तरुण पिढीची इतर गोष्टींपेक्षा खेळाप्रती आवड वाढेल. भविष्यात आणखी एक मैदान लवकरच उपलब्ध होणार असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.