नवरात्र - दसऱ्याचा आनंदोत्सवला ठाणे जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत बिदास्त वाजवा डीजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 03:54 PM2018-10-16T15:54:55+5:302018-10-16T16:04:04+5:30

ठाणे अतिरिक्त दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात एकसूत्रीपणा व एकच कालमर्यादा असण्याच्या दृष्टीने १६ ऑक्टोबर सप्तमी व १७ ऑक्टोबर अष्टमी असे दोन दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा विहित मर्यादेत वापर करण्यास अनुमती दिली

Navaratri - Jupiter of Dasara by playing at 12pm in Thane district at night | नवरात्र - दसऱ्याचा आनंदोत्सवला ठाणे जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत बिदास्त वाजवा डीजे

नवरात्र - दसऱ्याचा आनंदोत्सवला ठाणे जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत बिदास्त वाजवा डीजे

Next
ठळक मुद्दे ठाणे जिल्ह्यात १६ ,१७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगीआता  नवरात्र - दसऱ्याचा आनंदोत्सवला ठाणे जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत बिदास्त डीजे वाजवाता येणारहा आदेश संपूर्ण ठाणे जिल्ह्याला लागू

 

ठाणे : नवरात्र व दसऱ्यानिमित्त ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा ठाणे जिल्ह्यात वापर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिसांना निर्देश दिले असून आता सुधारित आदेशाप्रमाणे १६ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी दिली आहे. यामुळे आता  नवरात्र - दसऱ्याचा आनंदोत्सवला ठाणे जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत बिदास्त डीजे वाजवाता येणार आहे .

यासाठी ठाणे अतिरिक्त दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात एकसूत्रीपणा व एकच कालमर्यादा असण्याच्या दृष्टीने १६ ऑक्टोबर सप्तमी व १७ ऑक्टोबर अष्टमी असे दोन दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा विहित मर्यादेत वापर करण्यास अनुमती दिली आहे.

नवरात्रोत्सवात १७ तारखेस अष्टमी आणि १८ तारखेस म्हणजे नवमीच्या दिवशी दसरा आला आहे. यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकासाठी नेमक्या कोणत्या दिवशी परवानगी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल मागविला होता.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने १७ आणि १८ ऑक्टोबर असे दोन दिवस तर ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे ग्रामीण पोलीस यांनी १६ आणि १७ ऑक्टोबर अशा तारखांची शिफारस केली होती. त्यामुळे आदेशांत एकसूत्रीपणा असावा म्हणून पूर्वीच्या आदेशांत अंशत: बदल करून १६ ऑक्टोबर व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला. हा आदेश संपूर्ण जिल्ह्याला लागू असेल. यामुळे आता  नवरात्र - दसऱ्याचा आनंदोत्सवला ठाणे जिल्ह्यात रात्री १२ वाजेपर्यंत बिदास्त डीजे वाजवाता येणार आहे

Web Title: Navaratri - Jupiter of Dasara by playing at 12pm in Thane district at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.