भिवंडीत प्रवीण दरेकरांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचे जोडे मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 16:30 IST2021-09-16T16:25:57+5:302021-09-16T16:30:39+5:30
BJP Pravin Darekar And NCP : भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रवीण दरेकरांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.

भिवंडीत प्रवीण दरेकरांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचे जोडे मारो आंदोलन
नितिन पंडीत
भिवंडी - विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सार्वजनिक सभेत महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे पडसाद उमटले असून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकर यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी करीत आंदोलन सुरू केले असून गुरुवारी भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रवीण दरेकरांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.
शहरातील स्व. आनंद दिघे चौक येथे एकत्रित झालेल्या महिलांनी प्रवीण दरेकरांच्या बॅनरवर महिलांच्या वेशातील प्रवीण दरेकरांचा फोटो लावून प्रविणा मावशी असा उपरोधिक उल्लेख करीत त्यास लिपस्टिक लावली व त्यानंतर हे पोस्टर जाळून प्रवीण दरेकरांचा निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.