राष्ट्रीय लोक अदालतीचा निकाल, मोटार अपघातातील केवळ दोन प्रकरणांत ३.२४ कोटींची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:11 IST2026-03-15T13:10:50+5:302026-03-15T13:11:12+5:30
ठाणे जिल्ह्यात पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी केले होते. ठाणेचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशानुसार विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर यांच्या मार्गदर्शनात प्रकरणे निकाली काढण्याचे काम करण्यात आले.

राष्ट्रीय लोक अदालतीचा निकाल, मोटार अपघातातील केवळ दोन प्रकरणांत ३.२४ कोटींची भरपाई
ठाणे : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून मोटार अपघातातील दोन प्रकरणांचा महत्त्वपूर्ण निकाल शनिवारी लागला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ३ कोटी २४ लाखांची भरपाई मंजूर केली. यामध्ये खालापूर येथील प्रकरणात दोन कोटी १४ लाख, तर भिवंडी येथील प्रकरणात एक कोटी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचा समेट घडवून आणण्यात आला.
ठाणे जिल्ह्यात पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी केले होते. ठाणेचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या आदेशानुसार विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर यांच्या मार्गदर्शनात प्रकरणे निकाली काढण्याचे काम करण्यात आले. मोटार अपघात दाव्यांसाठी तीन पॅनेल तयार केले होते. या पॅनेलची जबाबदारी न्या. दुर्गाप्रसाद देशपांडे, न्या. आर. यू. मालवणकर आणि न्या. के. पी. श्रीखंडे यांच्यावर होती.
खालापूरमधील अपघातात ओमकार जोशी यांचा मृत्यू झाला होता. न्या. मालवणकर यांच्या पॅनेलसमोर विमा कंपनी आणि वारसदारांत दोन कोटी १४ लाखांच्या भरपाईवर समेट घडली. दुसरे प्रकरण भिवंडीतील आहे. आनंद राजन नाडार (४८) यांचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्या. मालवणकर यांच्या पॅनेलसमोर एक कोटी १० लाखांच्या भरपाईवर समेट झाली.