टेंम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By नितीन पंडित | Updated: November 15, 2022 19:46 IST2022-11-15T19:46:01+5:302022-11-15T19:46:40+5:30
टेम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे.

टेंम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश, साडे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच टेम्पोमध्ये ११ लाख ८८ हजार ११४ रुपयांचे कापडाचे रोल घेऊन टेम्पो चालक जात असताना दापोडारोड, वळगांव या ठिकाणी चहा नाष्टासाठी थांबला असता अज्ञात चोरट्याने टेम्पो मालासह घेऊन फरार झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार, सहा.पोलीस उप निरीक्षक डी.डी.पाटील, बी एस नवले, पोलीस कर्मचारी बी बी चव्हाण, हरेश म्हात्रे, लक्ष्मण सहारे, सुनिल शिंदे, योगेश क्षिरसागर, मयुर शिरसाट, विजय ताठे या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे माग काढून अवघ्या २४ तासात अमरदीप चंद्रकांत जयस्वाल, वय ३५, रा.कल्याण व जुबेर अहमद मजिदअली खान,वय ३५,रा.वडाळा मुंबई अशा दोघा आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ९ लाख ४९ हजार १६७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नारपोली पोलिसांनी दाखल गंभीर गुन्ह्यात अवघ्या २४ तासात आरोपींच्या मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केल्याची महिना नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी मंगळवारी दिली आहे.