शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

ठाण्याच्या महापौरपदी नरेश म्हस्के; उपमहापौरपदी पल्लवी कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:49 AM

केवळ औपचारिकता शिल्लक, शिवसेनेतील गटबाजी मात्र आली चव्हाट्यावर

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी अपेक्षेप्रमाणे अखेर नरेश म्हस्के यांनी, तर उपमहापौरपदासाठी आयत्यावेळी पल्लवी कदम यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज भरले. राष्ट्रवादीला माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नव्या समीकरणाची आठवण करून देत उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती केली. तर, भाजपने अर्जच भरला नाही. यामुळे आता म्हस्के यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच शिल्लक आहे. दुसरीकडे देवराम भोईर कुटुंबीयांनी जाहीर नाराजी व्यक्त करून दोन वर्षांनंतर बघा, असे सांगून शिवसेनेच्या नेत्यांना बंडाचा इशारा दिला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत असली, तरी शिवसेनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसले.आरक्षण सोडतीत महापौरपद सर्वांसाठी खुले झाल्याने त्यासाठी अनेक जण इच्छुक होते. यामध्ये सुरु वातीपासूनच नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या देवराम भोईर यांनादेखील महापौरपदाची कमिटमेंट दिली गेली होती. त्यामुळे तेदेखील या पदासाठी इच्छुक होते. परंतु, शनिवारी केवळ म्हस्के यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी नगरसेवक उमेश पाटील तसेच सुधीर कोकाटे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, या दोघांनीही नकार दिला होता. त्यामुळे नगरसेविका पल्लवी कदम यांच्या गळ्यात हे उपमहापौरपद टाकण्यात आले. म्हस्के यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाणे पूर्व भागाला महापौरपदाची संधी मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी दिल्याने त्यांना महापौरपद देण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरूहोती.म्हस्के यांच्या भूमिकेकडे लक्षविद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांची कारकीर्द गाजली, ती आयुक्त आणि त्यांच्यातील संघर्षामुळे. अनेकवेळा नरेश म्हस्के यांच्यावरच या संघर्षातून मार्ग काढण्याची वेळ आली होती. यामुळे त्यांना सर्वपक्षीय मित्र मानले जात असून वेळप्रसंगी त्यांनी प्रशासनाची बाजूदेखील सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ते स्वत: महापौर असल्याने ते प्रशासनासंदर्भात कारभार चालवताना काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मागील २५ वर्षे ठाणेकरांनी शिवसेनेवर जो विश्वास दाखविला आहे, तो आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करणार आहे. नगरसेवकांच्या अधिकारावर गदा येऊ देणार नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एकमेकांच्या हातात हात घालून काम करुन विकासावर भर देणार.- नरेश म्हस्केएकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीची माघारमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार हे जवळजवळ निश्चित होते. परंतु, राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची समीकरणे निश्चित होत नसल्याने व आपले अस्तित्व टिकविण्यासाठी राष्ट्रवादीने अचानकपणे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शनिवारी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या केबिनमध्ये त्यांची बैठक सुरूहोती. त्याचवेळेस एकनाथ शिंदे यांनी त्याठिकाणी हजेरी लावून राज्यात आपल्या तीनही पक्षांची समीकरणे जुळत आहेत, त्यामुळे तुम्ही ठाण्याची निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन करून अर्ज दाखल न करण्याची विनंती केली. त्यानुसार, त्यांच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादीने या निवडणुकीतून माघार घेतली.समजुतीनंतरही संजय भोईर नाराजशनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय भोईर यांनीदेखील हजेरी लावून आपली नाराजी जाहीर व्यक्त केली.यावेळी खासदार राजन विचारे आणि आमदार सरनाईक यांनी महापालिका मुख्यालयातील लॉनवरच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. एक वर्ष तुम्हाला महापौरपद मिळेल, असेही भोईर यांना सांगण्यात आले. मात्र, तरीही त्यांची नाराजी दूर झाली नाही.त्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नरेश म्हस्के यांच्या केबिनमध्ये त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना स्थायी समितीचेही आश्वासन देण्यात आले. मात्र, आता वेळ निघून गेली असल्याचे सांगून त्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत असली, तरी भोईर यांच्या नाराजीमुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस