केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार द्यावेत, नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:54 PM2020-05-20T12:54:03+5:302020-05-20T12:59:36+5:30

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी.

Narendra Pawar demands free treatment on Kovid patients in KDMC area through Mahatma Phule Arogya Yojana |  केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार द्यावेत, नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   

 केडीएमसी क्षेत्रातील कोविड रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार द्यावेत, नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   

Next

डोंबिवली - महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसाठी मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय १ मे महाराष्ट्र दिनी राज्याचे आरोग्यमंत्रीराजेशजी टोपे यांनी जाहिर केला आहे. असे असतांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी करणारे पत्र भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बुधवारी दिले आहे.

केडीएमसी आयुक्तांच्या या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. पांढऱ्या रेशनकार्ड धारकांना आता बिल का आकारले जात आहे? राज्य शासनाने राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत उपचार देण्याचे जाहीर केलेले असतांना महानगरपालिकेमार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणे हे अयोग्य असून  लॉकडाऊन काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले असुन अश्या काळात नागरिकांत संभ्रम आणि नाराजी आहे.केंद्र व राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कोरोना योद्धे पुढे येऊन अत्यावश्यक सेवेत सहाभागी झाले आहेत, दुर्दैवाने त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनाही उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे, याशिवाय अनेक पोलीस व इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींनाही हा निर्णय जाचक ठरत आहे. त्या निर्णयावर तातडीने कार्यवाही करीन महानगरपालिका प्रशासनास आदेश द्यावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Narendra Pawar demands free treatment on Kovid patients in KDMC area through Mahatma Phule Arogya Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.