शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Voting 2019 : मतदान यंत्रावर नावेच दिसेनात; मतदान करायचे तरी कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 09:17 IST

ठाण्यामध्ये पावसामुळे मतदान केंद्रांबाहेर चिखल झाला आहे.

ठाणे : राज्यभरात पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे सोलापूरमध्ये काही मतदान केंद्रांमध्ये पाणी घुसले असून ठाण्यात तर एका मतदान केंद्राच्या परिसरामध्ये वीजच गायब झाली आहे. 

ठाण्यामध्ये पावसामुळे मतदान केंद्रांबाहेर चिखल झाला आहे. या चिखलात रांगेत उभे राहून मतदान करावे लागत आहे. अंबिका नगर भागात विद्युत प्रवाह बंद झाला आहे. अर्धा तास झाला तरीही वीज प्रवाह सुरळीत झाला नव्हता. मोबाइल बॅटरीच्या प्रकाशामध्ये मतदान सुरु करण्यात आले आहे.  मात्र, यंत्रांच्या ठिकाणी उमेदवारांची नावे दिसत नाही, त्यामुळे अडचणी वाढत आहेत.

तर राज्यभरात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडाचे वृत्त येत असून अनेक ठिकाणी भर पावतास मतदारांना पावसात ताटकळत रहावे लागत आहे. बुलढाणा: सिं. राजा मतदार संघ २४ मधील देऊळगांव राजा बुथ क्र .२०५म . फुले येथील मशीनत मतदान सुरू होण्यापुर्वीच बिघाड झाला. येथील मशीन १ तास ४ मिनिटे बंद होती . ८ वाजून ४ मिनिटांनी मतदान सुरू झाले. या मतदान केंद्रावर संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. अद्याप कोणाचीही तक्रार नाही.

नांदेड : नांदेड  उत्तर- तरोडा बुद्रुक सना उर्दू प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.05 येथे सकाळी 7 पासून ईव्हीएम यंत्रात बिघाड झाला आहे. एक तासापासून मतदार पावसात रांगेत उभे आहेत. प्रशासनाची कार्यवाही सुरू असून काही वेळात मतदान सुरळीत होईल, असे अधिकार्‍याकडून सांगितले जाते.

तर भुसावळ मतदार संघातील कुऱ्हे पानाचे येथे बुथ क्रमांक 280 वरील केंद्रातील ईव्हीएम मशीन मध्ये खराब झाल्यामुळे. तब्बल एक तास 45 मिनिटे मतदारांना तातकळत राहावे लागले. आठ वाजून 45 मिनिटांनी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला.

भंडारा : तुमसर तालुक्यातील सीतेपर येथे ईव्हीएममध्ये सकाळी ९ वाजता बिघाड. तर जळगाव ग्रामीण मतदार संघात प थ राड या केंद्रात यंत्रात बिघाड. पूर्ण सेट बदलला. 

टॅग्स :thane-acठाणे शहरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhandara-acभंडारा