शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र आव्हाडांना नाईकांचा चेकमेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 03:31 IST

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गेल्या काही दिवसांतील जवळीचा पहिला फटका आव्हाडांना बसला आहे.

ठाणे - ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गेल्या काही दिवसांतील जवळीचा पहिला फटका आव्हाडांना बसला आहे. ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी त्यांचे निकटवर्तीय आनंद परांजपे यांना कायम ठेवतानाच आव्हाडांचे विरोधक गणेश नाईक यांचे निकटवर्तीय संजय वढावकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ठाण्यात प्रथमच कार्याध्यक्षपदाची निर्मिती करण्यामागे आव्हाडांच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेवण्याची खेळी पक्षश्रेष्ठींनी खेळल्याची चर्चा सुरु झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात शिंदे आणि आव्हाड मैत्रीची चर्चा जोर धरू लागली आहे. आता या मैत्रीची पक्षश्रेष्ठींनीसुध्दा दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील इतर शहर अध्यक्षपदांच्या नियुक्त्या झाल्यानंतर ठाण्याच्या शहर अध्यक्षपदी परांजपे यांना कायम ठेवण्यात आले. परांजपे यांना हटविण्यासाठी मध्यंतरी नाईक गटाकडून हालचाली झाल्या. परांजपे यांच्याकडून पक्षाने खुलासा मागवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांनी शहर अध्यक्षपदाकरिता गुडघ्याला बाशींग बांधले होते. परंतु आव्हाडांच्या हट्टापुढे अखेर पक्षाने नमते घेत परांजपे यांना कायम ठेवले. मात्र कार्याध्यक्षपदी विरोधी गटाच्या वढावकर यांना नियुक्त करुन समतोल साधण्याचा प्रयत्न केला.परांजपे यांनी आंदोलनांच्या माध्यमातून ठाण्यात पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे व आव्हाड यांचा आग्रह यामुळे त्यांना ही बक्षिशी देण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे परांजपे यांचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्षपद काढून घेण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. नाईक यांच्या गटाला खूष करण्याकरिता प्रथमच कार्याध्यक्षपदी कामगार नेते संजय वढावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वढावकर हे नाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. नाईक यांनी शहर अध्यक्षपदासाठी वढावकर यांच्या नावाची शिफारस श्रेष्ठींकडे केली होती. अखेर वढावकर यांना कार्याध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. शरद पवार हे ‘एक तीर मे दो निशान’ साधण्यात पटाईत असून येत्या निवडणुकीच्या निमित्ताने आव्हाड आणि नाईक यांना गोंजारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाच्या नियुक्त्याठाणे शहर आनंद परांजपे, संजय वढावकर (कार्याध्यक्ष), दशरथ तिवरे (ठाणे ग्रामीण), रमेश हनुमंते (कल्याण डोंबिवली), ज्योती कालानी (उल्हासनगर) आणि खलिद गुड्डु - शहर अध्यक्ष आणि अनिल फडतरे (कार्याध्यक्ष) अशा नियुक्त्या झाल्या आहेत.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडGanesh Naikगणेश नाईक