शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

ठाण्यातील मुंब्रा, लोकमान्यनगर आणि किसननगर भागात पोलिसांची ड्रोनद्वारे नागरिकांवर करडी नजर

By जितेंद्र कालेकर | Updated: April 28, 2020 01:51 IST

दाट लोकवस्तीची ठिकाणे तसेच बाजारपेठांमधील गर्दीच्या परिसरावर थेट आकाशातून नजर ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ड्रोन कॅमेरे दिले आहेत. लोकमान्यनगर, किसननगर आणि मुंब्रा या भागातील नागरिकांवर पोलिसांकडून या ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे.

ठळक मुद्दे सोशल डिस्टसिंगसाठी होतोय प्रभावी वापरपालकमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलिसांना दिले दोन ड्रोन कॅमेरे

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरातील दाट लोकवस्तीची ठिकाणे तसेच बाजारपेठांमधील गर्दीच्या परिसरावर थेट आकाशातून नजर ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ड्रोन कॅमेरे दिले आहेत. आधी दोन कॅमेरे उपलब्ध असल्यामुळे आता चार कॅमेऱ्यांद्वारे लोकमान्यनगर, किसननगर आणि मुंब्रा या भागातील नागरिकांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकीकडे नागरिकांना कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी त्यांच्यावर कारवाई करता करता ठाण्यातील सुमारे २२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात बहुतांश पोलिसांना विलगीकरणातही ठेवावे लागले. पोलिसांचे बळ कमी पडत असतांना सोशल डिस्टसिंगची अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने ठाणे शहर पोलिसांनी भिवंडी आणि मुंब्रा या परिसरासाठी आधीच दोन ड्रोन कॅमेºयांद्वारे नजर ठेवली आहे. आता वागळे इस्टेट परिमंडळातील किसननगरसारख्या एकाच भागात कोरोनाचे ४२ रुग्ण आढळल्याने या भागातही ड्रोनद्वारे नजर ठेवण्याची व्यूहरचना वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी केली आहे. त्यानुसार आता वागळे इस्टेट येथील किसननगर, भटवाडी, महाराष्टÑनगर, श्रीनगर, पडवळनगर, इंदिरानगर तसेच याआधी सील केलेला लोकमान्यनगर या ठामपा प्रभाग क्रमांक सहाच्या परिसरावरही ड्रोनद्वारे श्रीनगर आणि वर्तकनगर पोलीस नजर ठेवणार आहेत. किमान दिड ते दोन किलोमीटरच्या परिसरात सुमारे १५०० मीटर उंचीवरुन हे ड्रोन कॅमेरे फिरणार आहेत. त्यामुळे पोलिसांना एकाच ठिकाणावरुन गर्दी होणाºया ठिकाणी नागरिकांवर सहज नजर ठेवता येणार आहे. यातून घरातून बाहेर पडणा-यांचे छायाचित्रही काढले जाणार असून संबंधितांना ड्रोनवरील ध्वनीक्षेपकाद्वारे कारवाईचा इशाराही दिला जाणार आहे. 

‘‘ड्रोन कॅमे-यांद्वारे एकाच ठिकाणावरुन एक ते दोन किलोमीटरच्या परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. जिथे व्यक्तीश: पोहचणे शक्य नाही, अशा ठिकाणीही ड्रोनचा प्रभावीपणे उपयोग होणार आहे. यातून ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन वजा इशारा केला जाईल. तरीही नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळल्यास संबंधितांवर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल.’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस