बदलापुरातून नवी मुंबईला पोहोचा अवघ्या ३० मिनिटांत, नव्या रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:14 IST2025-04-12T09:08:59+5:302025-04-12T09:14:25+5:30
Mumbai Suburban Railway: बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान लवकरच ‘पुढील स्टेशन-कासगाव’ अशी उद्घोषणा ऐकू येणार आहे. कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी देत रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू केले आहे.

बदलापुरातून नवी मुंबईला पोहोचा अवघ्या ३० मिनिटांत, नव्या रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षण सुरू
बदलापूर - बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान लवकरच ‘पुढील स्टेशन-कासगाव’ अशी उद्घोषणा ऐकू येणार आहे. कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी देत रेल्वेकडून सर्वेक्षण सुरू केले आहे. हे स्टेशन झाल्यास बदलापूरवासीयांना ३० मिनिटांत नवी मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे.
बदलापूर शहरातून दररोज हजारो प्रवासी नवी मुंबईला नोकरी-धंद्यानिमित्त जातात. या प्रवाशांना रेल्वेने जायचे झाल्यास ठाण्यावरून लोकल बदलून जावे लागते, तर रस्ते मार्गाने एनएमएमटीच्या निवडक बससेवा उपलब्ध आहेत. या प्रवासासाठी दीड तासांचा वेळ लागतो. पण, कासगावपासून नवी मुंबईला जोडणारा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार. रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला.