शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Mumbai Rain : वाचवा वाचवा... माजी आमदाराने मध्यरात्री दोरीच्या सहाय्याने कुटुंबाला वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 10:29 AM

Mumbai Rain : परांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

ठळक मुद्देपरांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी रात्रीही मुसळधार पाऊस सुरूच होता. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी आणि कसारा स्थानकारदरम्यान, तसंच अंबरनाथ आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकल सेवा थांबवण्यात आली. तर, जिल्ह्यातील अनेक भागात पावसामुळे घराबाहेर पडणेही अवघड होऊन बसले होते. शहापूर तालुक्यातील परांजपेनगर भागात एक कुटुंब घरात अडकले होते. घराच्या चोहोबाजूंनी पाण्याने वेढल्याने ते कुटुंबा मदतीसाठी वाचवा... वाचवा... अशी साद घालत होते. त्यावेळी, शिवसेना नेते माजी आमदार पांडुरंग बोरकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे धाव घेतली. 

परांजपेनगर चेरपोली हायवेलगतच्या मैदानावरील एका घरात 3 लहान मुले व त्यांचे आई वडील पाण्यात घर बुडाल्यामुळे अडकून पडले होते. याबाबत माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दोराच्या सहाय्याने त्यांनी या कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढले. त्यामुळे, शिवसेना नेते पांडुरंग बरोरा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होते आहे. याबाबत स्वत: बरोरा यांनीही फेसबुक पेजवरुन घटनेची माहिती दिली आहे. रात्रीचे १२ वाजले होते, पाऊस मुसळधार पडत होता, वीजही गेली होती. एवढा मोठा पाऊस मी यापूर्वीही कधी पाहिला नव्हता. मी रहात असलेल्या परांजपेनगर येथील माझ्या घराच्या बाजूचा नाला तुडुंब भरुन वाहत होता. तर, माझ्या घराच्या पायरीलाही पाणी लागले होते. त्यामुळे बाहेर आलो तर समोर वाचवा वाचवा असा आवाज येऊ लागला. त्यावेळी, समोरच्या मोकळ्या मैदानात असलेल्या घराला पाण्याने वेढा मारला होता. समोरच्या घरातून इशारा करण्यासाठी बॅटरी मारत होते. तात्काळ पोलिस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यांना याबाबत कळविले. परंतु, त्या घरात पाणी वाढत असल्याने सातत्याने वाचविण्यासाठी टाहो फोडत होते. रवि मडके त्यांचे काही सहकारी आले, त्यांना सोबत घेऊन दोराच्या सहाय्याने त्या घरातील पती पत्नी व 3 लहान बालके यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, अशी माहिती पांडुरंग बरोरा यांनी दिली आहे. 

लोकल वाहतुकीला पावसाचा फटका 

मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या दोन्ही मार्गावरील वाहतुकीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कसारा परिसरात केवळ ४ तासांमध्ये १३९ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय कसारा येथेही ट्रॅकवर पाणी साचलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बुधवारी रात्री सव्वादहा वाजल्यापासून इगतपुरी ते खर्डीदरम्यानची वाहतूकही थांबवण्यात आली असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईतही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूककोंडी झाली होती. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसShiv SenaशिवसेनाMLAआमदार