शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मुंबई - ठाण्यातील शिधावाटपच्या सव्वाचार हजार दुकानांचे एक हजार अधिकारी, कर्मचारी कोरोना लसीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 23:27 IST

Corona Vaccination News : सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. त्याात मुंबई, ठाणे जिल्ह्यात  दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.

ठाणे - सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. त्याात मुंबई, ठाणे जिल्ह्यात  दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणाऱ्य नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी, अधिकारी  बदलापूर, कल्याण, विरार,  पनवेल  अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करणारे चार हजार २२३ शिधावाटप दुकानांवरील एक हजार ५० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या लसीकरणपासून वंचित असल्याचा आरोप मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले व सरचिटणीस विनायक निकम  यांनी केला आहे. कोरोनाच्या या महामारीत सातत्याने अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम मुंबई, ठाणे शिधावाटप विभागाचे अधिकारी,  कर्मचारी प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत चार हजार २२३ शिधावाटप दुकानांमार्फत अन्नधान्याचा पुरवठा करीत आहेत. या यंत्रणेतील शिधावाटप अधिकारी, सहायक शिधावाटप अधिकारी, शिधावाटप निरीक्षक व कार्यालयीन कर्मचारी जनतेपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे काम चोखपणे बजावले आहे. या शहरांना कोरोना विषाणूचा विळखा पडलेला असताना शिधावाटप कर्मचारी, अधिकारी जीव मुठीत घेऊन जनतेपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे कर्तव्य प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून पार पाडत आहेत. 

 शिधावाटप यंत्रणेतील यांनी संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काम करणारे कर्मचारी, अधिकारी अद्याप लसिकरणापासून वंचित असल्याचे भोसले यांनी दिली.  या शिधावाटप यंत्रणेत सहायक नियंत्रकशिधावाटपची सात पदे मंजूर असून ती गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहेत, शिधावाटप अधिकारी हे कार्यालय प्रमुख पदांमधील ६० पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. तर सहायक शिधावाटप अधिकारी यांची १६ पदे रिक्त आहेत. शिधावाटप यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या शिधावाटप निरीक्षक यांची २५३  इतकी पदे रिक्त आहेत व इतर कर्मचारी यांची ४४८ पदे रिक्त आहेत संपूर्ण शिधावाटप यंत्रणेत १८९० पदांपैकी ७५१  एव्हढी पदे रिक्त आहेत. शासनाकडे  वारंवार पत्र व्यवहार करूनही अद्याप रिक्त पदेभरलेली नाहीत.

 कोरोनाची गंभीर परीस्थिती असताना अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम देखील  कर्मचारी/ अधिकारी यांच्या माथी मारली जात आहे. तूर्तास या अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात येऊ नये अशी मागणी संघटनेच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांच्याकडे केली आहे, असे मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले व सरचिटणीस विनायक निकम  यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे