Mumbai Local Crime: लोकल प्रवासात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:32 IST2026-04-03T11:30:29+5:302026-04-03T11:32:01+5:30

Ambarnath Chain Snatching: अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करत असताना गोरेगावमधील अनिता गुप्ता (वय ४३) हिची सोन्याची चेन चोरट्यांनी पळविली. ...

Mumbai Local Train Crime: Woman's gold chain stolen during local train journey in ambarnath | Mumbai Local Crime: लोकल प्रवासात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली

Mumbai Local Crime: लोकल प्रवासात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली

Ambarnath Chain Snatching: अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करत असताना गोरेगावमधील अनिता गुप्ता (वय ४३) हिची सोन्याची चेन चोरट्यांनी पळविली. त्यांना मैत्रिणीला भेटणे महागात पडले आहे.

तक्रारदार गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत, ३० मार्चला मैत्रिणीला भेटण्यासाठी अंबरनाथ येथे जात होत्या. गोरेगावहून दादर रेल्वे स्थानकावर येऊन त्यांनी दुपारी १.०८ वाजता फलाट क्रमांक ८ वरून अंबरनाथ धीमी लोकल पकडली. गर्दीमुळे त्या मोटरमन बाजूकडील दुसऱ्या जनरल डब्यात बसून प्रवास करत होत्या. दुपारी १.५७ वाजता दिवा रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर त्यांनी गळ्यातील चेन तपासली. त्यावेळी सोन्याची चेन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डब्यात शोध घेतला असता चेन सापडली नाही. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस तपास करीत आहेत.

Web Title : मुंबई लोकल: अंबरनाथ ट्रेन में महिला के गले से सोने की चेन छीनी

Web Summary : अंबरनाथ जा रही अनीता गुप्ता की लोकल ट्रेन में दादर से निकलने के बाद सोने की चेन चोरी हो गई। घटना 30 मार्च को हुई, और उन्हें दिवा स्टेशन पहुंचने पर चोरी का पता चला। ठाणे रेलवे पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Mumbai Local: Woman's Gold Chain Snatched on Ambernath Train

Web Summary : Anita Gupta, traveling to Ambernath, had her gold chain stolen on a local train after departing Dadar. The incident occurred on March 30th, and she discovered the theft upon reaching Diva station. Thane railway police are investigating the case.