ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक क्रेनमध्ये भ्रष्टाचाराचा मुंबईच्या जमादाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:37 AM2021-09-17T00:37:09+5:302021-09-17T00:41:04+5:30

ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वाहतूक क्रेनमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. याची थेट मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री तसेच ठाणे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली असून आपल्याला एका पोलिसानेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पोलीस दलातील जमादार विजय टोके यांनी केला आहे.

Mumbai Jamadar accused of corruption in transport cranes in Thane and Navi Mumbai | ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक क्रेनमध्ये भ्रष्टाचाराचा मुंबईच्या जमादाराचा आरोप

पोलीस गणवेशातच केला व्हिडिओ व्हायरल

Next
ठळक मुद्दे एका पोलिसानेच ठार मारण्याची धमकी दिल्याचाही केला दावापोलीस गणवेशातच केला व्हिडिओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वाहतूक क्रेनमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. याची थेट मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री तसेच ठाणे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली असून आपल्याला एका पोलिसानेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पोलीस दलातील जमादार विजय टोके यांनी केला असून तसा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
टोके यांनी सुरुवातीलाच आपले नाव सांगून मुंबईच्या मुख्य नियंत्रण कक्षात नोकरीवर असल्याचे म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वीच ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक क्रेनमधील भ्रष्टाचाराची माहिती दिल्याचे म्हटले आहे. या क्रेनवर भ्रष्टाचाराची वाळवी लागली असून ठाण्यातील नारपोलीतील पोलीस नाईक विजय सोने, काटे, मुंब्रा येथील चव्हाण आणि कळव्याचे भोईर, कापूरबावडी येथील शाम पाटील यांनी आपल्याला ठाण्यात येण्याचे आव्हान केले आहे. ‘तू ठाण्यात येऊन दाखव, तू मुंबईला परत जिवंत जाणार नाही, अशी धमकीच सोने यांनी दिल्याचा आरोपही या व्हिडिओमध्ये टोके यांनी केला आहे. दरम्यान, या व्हिडिओची खातरजमा करण्यासाठी टोके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्या आरोपांवर ठाम असून या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यावेळी प्रसारमाध्यमांकडेही आपली भूमीका मांडणार असल्याचा दावा त्यांनी केला.
तर वाहतूक शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
* ठाण्यात गेल्या १० ते १५ वर्षांपासून ठाणे वाहतूक शाखेत क्रेनचा भ्रष्टाचार सुरु असून एमएच वगळता ठाणे पोलिसांकडून नागालँड, कर्नाटक आणि गोवा येथून येणाऱ्या वाहनांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते, असाही आरोप टोके यांनी केला आहे.

Web Title: Mumbai Jamadar accused of corruption in transport cranes in Thane and Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app