मुंबईत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 06:28 IST2018-09-01T05:58:34+5:302018-09-01T06:28:51+5:30
अग्निशमन दलाकडून टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सकाळी 6 वाजेपर्यंतही आग आटोक्यात आली नव्हती.

मुंबईत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या दाखल
मीरारोड (ठाणे) - भाईंदरच्या उड्डाणपुलाजवळील एका प्लॅस्टिक शीट बनवणाऱ्या कंपनीस मोठी आग लागली आहे. आज (शनिवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे वृत्त समजताच मीरा भाईंदर महापालिकेतील सुमारे डझनभर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अग्निशमन दलाकडून टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सकाळी 6 वाजेपर्यंतही आग आटोक्यात आली नव्हती. आग मोठी असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी बाजूच्याच अल कॅन या कंपनीला अशीच भीषण आग लागली होती. दरम्यान, आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ -