शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

मल्टिप्लेक्सची लूट सुरूच; पॉपकॉर्न १५०, पाण्याची बाटली ६० रु.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:25 AM

मॉलमधील मल्टिप्लेक्सचालकांनी दि. १ आॅगस्टपासून एमआरपीनुसार खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने देऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ्ळ खट्याकचा आदेश देऊनही ठाणे व कल्याणमधील मल्टिप्लेक्सचालकांनी चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री सुरूच ठेवली आहे.

ठाणे/कल्याण : मॉलमधील मल्टिप्लेक्सचालकांनी दि. १ आॅगस्टपासून एमआरपीनुसार खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने देऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ्ळ खट्याकचा आदेश देऊनही ठाणे व कल्याणमधील मल्टिप्लेक्सचालकांनी चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री सुरूच ठेवली आहे. पॅकबंद खाद्यपदार्थ नेण्यास कुरकुरत का होईना तयारी दाखवलेल्या चालकांनी घरात बनवलेले पदार्थ नेण्यास मात्र मज्जाव केलेला आहे. सरकारचे आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, असा सोयीस्कर पवित्रा त्यांनी घेतला आहे.‘लोकमत’च्या ठाणे व कल्याणमधील प्रतिनिधींनी येथील काही मल्टिप्लेक्सला भेटी दिल्या. तेथील अडेलतट्टू सुरक्षाव्यवस्थेने पत्रकार असल्याची ओळख देऊनही आपल्या बेमूर्वतखोरीचा भंडाफोड होऊ नये, याकरिता सर्वप्रथम मल्टिप्लेक्समध्ये प्रवेशाला विरोध केला. मात्र, त्यानंतरही प्रतिनिधींनी चित्रपटाला आलेल्या दर्शकांना गाठून परिस्थितीचा अचूक वेध घेतला.महाराष्ट्र चित्रपट अधिनियम १९६६, कलम १२१ नुसार चित्रपटगृहात आणि फूडकोर्टसारख्या ठिकाणी बाहेरील खाद्यपदार्थ किंवा पाणी नेण्यास कोणतीही बंदी नाही. जर कोणी अटकाव करत असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, हे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात दिले आहे. परंतु, याबाबतचा अध्यादेश मिळाला नसल्याची माहिती कल्याण पूर्वेतील मल्टिप्लेक्सचालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. मात्र, खाद्यपदार्थांचे दर कमी केल्याचा दावा त्यांनी केला. नेमके किती दर कमी केले, याबाबत विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार दिला. वरिष्ठांशी संपर्क साधा, तेच किती दर कमी केले, याची माहिती देतील, असे सांगण्यात आले. सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आली असून त्याबाबतचा निर्णय ८ आॅगस्टला होणार असल्याचा दावा मल्टिप्लेक्सचालकांनी केला.दरम्यान, मॉलमधील फूड कॉर्नरवर चौकशी केली असता मॉलच्या आवारात बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास यापूर्वी मज्जाव होता. परंतु, सरकारचा अध्यादेश व मनसेच्या आंदोलनानंतर बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मुभा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटाच्या मध्यंतरावेळी काही दर्शकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जेमतेम पाचपंचवीस रुपये कमी करून दर कमी केल्याचा देखावा केला आहे. दर कमी करतानाच पॉपकॉर्नची क्वाँटिटी कमी केली असून समोशाचा आकारही कमी केला आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खरेदी केलेले खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये आत नेता येत आहेत. मात्र, घरून आणलेले पदार्थ सुरक्षारक्षक आत नेऊ देत नाहीत.या मल्टिप्लेक्समधील चित्रपटाच्या तिकिटांचे दर वाढीव असतात. त्यात खाद्यपदार्थांचे दर चढे राहिले, तर लोकांनी करमणुकीकरिता कुठे जायचे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे.- सागर सावंत, विद्यार्थीअनेक जुनी चित्रपटगृहे पाडून मल्टिप्लेक्स उभारली आहेत. जुनी चित्रपटगृहे स्वस्तात चित्रपट दाखवत होते. आता मल्टिप्लेक्स या गोंडस नावाखाली लूट सुरू आहे. ती थांबवणे गरजेचे आहे. पॉपकॉर्न, समोसे, कोक याकरिता पाचपट दर आकारणे अन्यायकारक आहे.- संगीता रिसबूड, नोकरदारमल्टिप्लेक्समध्ये दर स्वस्त झाले आहेत किंवा कसे, हे तपासून पाहण्याकरिता आम्ही गेले दोन दिवस ठिकठिकाणी पाहणी करत आहोत. मल्टिप्लेक्सचालक जर आम्हाला गंभीरपणे घेणार नसतील, तर खळ्ळ खट्याकला सामोरे जाण्यास तयार राहावे.- संकेत पाटील, मनसे कार्यकर्तामल्टिप्लेकसमध्ये चित्रपट पाहावे, म्हटले तर, खिशाला चाट बसते. या गोष्टीला कुठेतरी आळा बसलाच पाहिजे. मुलांनी मागितलेल्या पॉपकॉर्नची किंमत पाहून छातीत धडकी भरते, तर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे दर ऐकून घशाला कोरड पडते.- सुशांत चव्हाण, तरुणपाकीटबंद पदार्थांना आणण्याची परवानगी मिळाली आहे. पण, येथील दर मात्र अजून अव्वाच्या सव्वाच आहेत. पिण्याच्या पाण्याची बाटली ही अजून ६० रुपयांना घ्यावी लागते. - प्रसाद सुतार, तरुण१ आॅगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांचे दर कमी होणार होते. पण, अद्यापही पॉपकॉर्न घ्यायचे तर, १५० रुपयांपासूनच सुरुवात होते.- समिधा यादव, महिला

टॅग्स :thaneठाणे