शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या मनमानीविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 13:54 IST

या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

ठाणे  : संपूर्ण राज्यात नुकत्याच झालेल्या निर्सग चक्रीवादामुळे खुप मोठे नुकसान झाले. त्यामुळे वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी खंडीत झाला होता. परंतु तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युध्द पातळीवर काम करण्यास तयार झाले. त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती महावितरण प्रशासनाला करण्यात आली होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन आपला मनमानी कारभार केल्याचा आरोप महावितरणच्या एमएसईबी वकर्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आला आहे. या कामात सर्वानाच सरसकट कामाला लावले गेले, ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशांना देखील कामाला लावले, परंतु त्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पाठविले. परंतु या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

बुधवारी वागळे इस्टेट भागातील महावितरण कार्यालयाच्या आवारात या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग चक्री वादामुळे नुकसान झाले, अनेक ठिकाणी विजेची हानी झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर तयार होतो. त्यानुसार या कामाचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती, आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले होते, तसेच 50 वर्षे वयोगटातील कर्मचा:यांना या कामी पाठविले जाऊ नये असेही सांगण्यात आले होते. परंतु प्रशासनाने मनमानी कारभार करीत सरसकट सर्वानाच कामाला लावल्याचा आरोप यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष बनसोड यांनी केला आहे.

किमान गरजा भागविल्या जाव्यात ही हिच्छा होती, त्याला राहण्याची सोय होणो अपेक्षित होते, त्याला अंगोळीचे पाणी मिळणो अपेक्षित होते, जेवणाची सोय, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होते. 10 दिवसासाठी नेले होते, परंतु 30 दिवस उलटूनही त्यांच्याकडून काम करुन घेतले जात असून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, त्यातूनच एकाला अंघोळीचे पाणी मिळाले नाही, तो तलावात गेला आणि त्याचा मृत्यु झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्वाना मुख्यअभिंयता जबाबदार असल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी फेडरेशनची असल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तो र्पयत आंदोलन सुरुच राहिल असा इशाराही त्यांनी दिला.